प्रतिनिधी : कोपरखैरणे, सेक्टर 2/A : श्री लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट संचलित एस.व्ही.एन. इंग्लिश हायस्कूलने यंदाही आपली यशाची परंपरा कायम ठेवत १००% निकालाची घौडदौड कायम राखली आहे. शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याने यशस्वीरीत्या परीक्षेत बाजी मारत शाळेचे नाव उज्वल केलं आहे!
ही कामगिरी म्हणजे
विद्यार्थ्यांची सातत्यपूर्ण मेहनत,
शिक्षकांची वचनबद्ध साथ, आणि
शाळेने तयार केलेल्या उत्कृष्ट शैक्षणिक वातावरणाचे फळ म्हणावी लागेल. दर्जेदार शिक्षणासाठी ओळखली जाणारी ही शाळा आज पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
शाळेचे संस्थापक अध्यक्ष श्री. राम पाटील सर, मुख्याध्यापिका, सुपरवायझर, शिक्षकवृंद आणि पालकांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन केले आहे.
“ही फक्त सुरुवात आहे, आमच्या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि आमची गुणवत्ता यशाचे शिखर गाठणारच!” – असा विश्वास शाळेच्या वतीने व्यक्त करण्यात आला.