Saturday, August 2, 2025
घरमहाराष्ट्रडाॅ.संदीप डाकवेंच्या ‘तात्या’ पुस्तकाला निसर्ग फाऊंडेशनचा पुरस्कार जाहीर

डाॅ.संदीप डाकवेंच्या ‘तात्या’ पुस्तकाला निसर्ग फाऊंडेशनचा पुरस्कार जाहीर

तळमावले/वार्ताहर : सांगली जिल्हयातील लेंगरे येथील निसर्ग फाऊंडेशन या संस्थेच्यावतीने डाॅ.संदीप डाकवे यांच्या ‘तात्या’ या पुस्तकाला राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला असल्याची माहिती निवड समितीचे अध्यक्ष प्रा.संजय ठिगळे यांनी दिली आहे.
या पुरस्काराचे वितरण रविवार दि.27 एप्रिल, 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता लेंगरे (ता.खानापूर) जि.सांगली येथे आ.सुहास बाबर, पद्मश्री डॉ.विजयकुमार शहा, ज्येष्ठ अभिनेते माधव अभ्यंकर, अमोल बाबर, माजी जिल्हा परिषद सदस्य सुहास शिंदे, शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख संजय विभुते, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.विक्रमसिंह कदम, ॲड.संदीप मुळीक, संजय गांधी निराधार योजना खानापूर तालुका अध्यक्षा शीतल बाबर, जीवनप्रबोधनी महाविद्यालयाच्या कार्यवाह सोनिया बाबर, मनीषा बागल, निसर्ग सखी मंच अध्यक्षा डॉ.वैशाली हजारे, सरपंच लक्ष्मीबाई पाटील, उपसरपंच झाकीर पठाण व अन्य मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड. बाबासाहेब मुळीक तर स्वागताध्यक्षपदी माजी जिल्हा परिषद सदस्य व सहकार्यवाह फिरोज शेख आहेत.
डाॅ.संदीप डाकवे यांनी लिहलेले हे दहावे पुस्तक असून यामध्ये त्यांचे वडील राजाराम डाकवे (तात्या) यांचा संपूर्ण जीवनपट अतिशय सुंदर पध्दतीने मांडला आहे. सुप्रसिध्द व्याख्याते आणि लेखक प्राचार्य डाॅ.यशवंत पाटणे यांची कसदार प्रस्तावना या पुस्तकाला लाभली आहे. क्यु आर कोडच्या माध्यमातून तात्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग यात पहायला मिळत आहेत. हे या पुस्तकाचे वेगळेपण आहे. साहित्यिक क्षेत्रातील विविध दिग्गजांनी या पुस्तकाचे कौतुक केले आहे.
‘तात्या’ या पुस्तकाला निसर्ग फाउंडेशनचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अनेक मान्यवरांनी डाॅ.संदीप डाकवे यांचे अभिनंदन केले आहे.
सदर कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन निसर्ग संस्थेचे सल्लागार सुनील पाटील, सरचिटणीस निवास कदम, सचिव नानासाहेब मंडलिक, अध्यक्ष नितीन चंदनशिवे, खजिनदार भगवान जाधव, प्रकल्प संचालक प्रमोद भोसले, सूरज मंडले, अभि गायगवळे, जीवन धेंडे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments