.
प्रतिनिधी(रमेश औताडे) : दक्षिण मुंबईतील शॉपिंग सेंटरच्या महिला प्रसाधनगृहात घुसून एका वकील महिलेचा विनयभंग करणारा सरकारकडे अद्यावत माहिती नसलेला परप्रांतीय सुरक्षा रक्षक संदीप पांडे याला पोलिसांनी अटक केली.
याअगोदर अशा घटना घडल्या आहेत. त्यातील 99 टक्के सुरक्षा रक्षक परप्रांतीय आहेत. परराज्यातून तडीपार केलेले हे गुंड महाराष्ट्रात नोकरी करतातच कसे ? या तक्रारीवरून दिवंगत गृहमंत्री आर आर पाटील यांनी राज्यातील सर्व सुरक्षा रक्षकांची एकत्रित माहिती गोळा करून त्याचा एकत्रित डाटा एका क्लिकवर मिळावा यासाठी प्रयत्न केले होते. मात्र पुढे त्यावर सरकारने व गृहविभागाने अद्यापही गांभिर्याने काहीच केले नसल्याने परप्रांतीय सुरक्षा रक्षकाकडून महिलांच्या विनयभंगाच्या घटना सुरूच आहेत व त्या सुरूच राहतील अशी भीती महिला संघटना करत आहेत.
तीन दिवसांपूर्वी झालेल्या ताज्या घटनेतील महिला वकील असून ती खासगी लॉ फर्ममध्ये कामाला आहे. ती एका शॉपिंग सेंटरच्या वॉशरूममध्ये गेली होती. त्यावेळी आरोपी सुरक्षा रक्षक संदीप पांडे हा महिलांच्या वॉशरूममध्ये तिला दिसला. महिला प्रसाधनगृहात तुझे काम काय ? असे तिने त्याला विचारले. त्यानंतर पांडे हा घाबरला व तो बाहेर पळाला. त्यानंतर पीडितेने प्रसाधनगृहाच्या आतून कडी लावली. तेव्हा पांडे तिला पुन्हा आत दिसला. पीडितेने मदतीसाठी धावा सुरू केला. तेव्हा पांडे याने तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. तिने त्याला बुक्का मारून लाथ मारली. त्यानंतर पांडे हा प्रसाधनगृहातून बाहेर पडला. या प्रकरणानंतर संबंधित आरोपीविरोधात पीडितेने आझाद मैदान पोलिसात तक्रार नोंदवली गेली. आता तपास सुरू होईल व त्याला शिक्षा होईल व पुन्हा ये रे माझ्या मागल्या अशी स्थिती होईल. मात्र यावर कायम स्वरुपी तोडगा निघणार आहे की नाही ? असा सवाल महिला करत आहेत.
खाजगी सुरक्षा रक्षक एजन्सी चे मालक मंत्रालयात बिनधास्तपणे फिरत असतात. त्यांना कोणाचा आशीर्वाद असतो ? १९८१ साली सरकारने सुरक्षा रक्षक कायदा केला. सरकारचा हा कायदा असा आहे की , अनेक कंपन्या , मॉल , बँका , आस्थापना , कारखाने , महामंडळे इतर सरकारी कार्यालयात महाराष्ट्र सुरक्षा रक्षक मंडळाचे सुरक्षा रक्षक नियुक्त केले पाहिजेत. किंव्हा त्या त्या कंपन्यांचे सुरक्षा रक्षक त्यांनी नियुक्त केले पाहिजेत. जर सुरक्षा मंडळाकडे सुरक्षा रक्षक नसतील तर तसे हमी पत्र घेऊन खाजगी सुरक्षा रक्षक कंपनीने सूट प्राप्त अर्ज करून त्या ठिकाणी आपली सुरक्षा यंत्रणा कार्यरत करावी.असे आदेश आहेत.कायदा आहे. मात्र मंत्रालयात सर्वत्र आलबेल आनंदी आनंद असल्याने खाजगी सुरक्षा रक्षक कंपनीचे मालक बिन्धास्त मोकाट मंत्रालयात फिरत आहेत. सरकारी सुरक्षा रक्षक मंडळातील कोरोना काळात ऑन ड्युटी मृत सुरक्षा रक्षकांच्या विधवा पत्नी मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवत असताना व दिवंगत आर आर पाटील यांच्या सूचनेला दाखवलेली केराची टोपली सामान्य जनतेला आच्छे दीन कधी आणणार असा सवाल महिला वर्ग करत आहेत.