Saturday, August 2, 2025
घरमहाराष्ट्रसोळशी विभाग ३२ गाव समाजाच्या अध्यक्ष पदी धोंडीबा धनावडे यांची बिनविरोध निवड

सोळशी विभाग ३२ गाव समाजाच्या अध्यक्ष पदी धोंडीबा धनावडे यांची बिनविरोध निवड

्रतिनिधी(नितीन गायकवाड) – कोयना सोळशी कांदाटी आणि बामणोली हा सर्व मिळून १०५ गाव समाज आणि या १०५ गाव समाज अंतर्गत पुन्हा ४३ गाव कोयना…१६ कांदाटी…२२ गाव बामणोली…३२ गाव सोळशी असे ४ विभाग आहेत आणि या चार ही विभागात स्वतंत्र समाजाचा अध्यक्ष देखील असतो. याच अध्यक्ष पदाची नेमणूक काल ३२ गाव समाज बांधव एकत्र येऊन आपटी या गावात सोमजाई काळेश्वरी मंदिरात पार पडली. अनेक गोष्टी वर चर्चा करत असताना शेवटी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे आणि समाज बांधव याच्या प्रत्येक सुख दुःखात सहभागी असणारे स्पष्ट वक्ते म्हणून ज्याच्याकडे पाहीले जाते असे तापोळा गावचे सुपुत्र श्री धोंडीबा धनावडे यांची एक मताने बिनविरोध झाली. काही दिवसा पूर्वीच त्याच्या वडिलांचे निधन झाले. ज्यांनी प्रचंड मेहनत करून आणि वारकरी पताका हाती घेऊन आपले जीवन आनंदमय सुखमय बनवत आपल्या मुलांना योग्य संस्कार देत त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले. आणि समाज सेवेत रुजू केले. त्याचे आशीर्वाद त्याची शिकवण खऱ्या अर्थाने आज या निमित्ताने पुन्हा श्री.धोंडीबा शेठ धनावडे यांच्या पाठीशी उभी राहिली. या अध्यक्षपदाच्या निवडीमुळे त्यांच्यावर परिवार मित्र मंडळ, तसेच ग्रामस्थ व समाज बांधव यांनी शुभेच्छांचा वर्षाव देखील करण्यात आला. त्यांच्या निवडीने एका चांगल्या सामाजिक जाण असणाऱ्या व्यक्तीला संधी मिळाल्यामुळे नक्कीच ३२ गाव समाजाचा विकास तर होईलच.पण त्याचा आदर्श घेऊन इतर विभागात सुद्धा त्यांच्या कार्याचे कौतुक होईल यामध्ये तिळमात्र शंका नाही.

श्री धनावडे यांनी सर्व ३२ गाव समाज बांधवांचे त्याचबरोबर इतर समाजाचे देखील आभार मानले आहेत.
RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments