ताज्या बातम्या
शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे दादर रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करण्याबाबत निवेदनधारावीत लवकरच सुरु होणार… आंदोलनाचा धडाका धारावी बचाव आंदोलनची माहितीधारावी पुनर्विकास सर्वेक्षणात घोटाळ्याचा आरोप; ९६% रहिवासी अपात्र ठरल्याने संताप खा. वर्षा गायकवाड यांची सरकारकडे हस्तक्षेपाची मागणी; वसुलीचा खेळ थांबवण्याचे आवाहनमुंबईत कोलोरेक्टल कॅन्सरबाबत गंभीर अज्ञान; फक्त १८.९% लोकांना शौचात रक्त दिसणे हे लक्षण असल्याची माहितीछोटे पक्ष, गट, संघटनांनी रिपब्लिकन पक्षात सामील व्हावे ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे आवाहन; राष्ट्रवादी चे नेते जीवन जाधव यांचा ही रिपब्लिकन पक्षात प्रवेश

भारताला जोडणारी ” राष्ट्रीय एकात्मता यात्रा “

मुंबई (रमेश औताडे) : पूर्वोत्तर भारत आणि देशातील इतर भागाला जोडणारी ” राष्ट्रीय एकात्मता यात्रा ” आहे. असे मत केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी मुंबईत एका जाहीर पत्रकार परिषदेत केले.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व आंतर-राज्य छात्र जीवन दर्शन आयोजित ‘राष्ट्रीय एकात्मता यात्रा २०२५’ जनता अभिनंदन सोहळा मुंबई विद्यापीठात संपन्न झाला. यावेळी संघटनमंत्री आशिष चौहान, मुंबई विद्यापीठाचे डॉ. रवींद्र कुलकर्णी, विशाद मफतलाल, सचिव दीपक दळवी, गितेश सामंत, रुपाली बोरीकर, प्रशांत माळी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

“वेगळ्या भाषा, वेगळे वेश, तरीपण महान भारत देश’, अशी घोषणा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत कार्यकर्ते देत असतात. ही घोषणा म्हणजे ‘अभाविप’ आणि राष्ट्रीय एकात्मता यात्रा यांच्यातील साम्यता आहे. देशात एकात्मतेचा भाव विविध समाजात निर्माण व्हावा हा या यात्रेमागचा उद्देश आहे असे आशिष चौहान यांनी सांगितले.

एकूण ३२ प्रमुख विभागात २३० युवा प्रतिनिधी या यात्रेत सहभागी झाले आहेत. त्यात १२५ युवक आणि १०५ युवती आहेत. ६८ हे जनजाती क्षेत्रातील आहेत. मुंबई, दिल्ली, चंदीगड, हैदराबाद, नंदुरबारमधून यात्रा सुरू आहे.

Scroll to Top