कराड प्रतिनिधी : नौसैनिक सेवामुक्त झाल्या नंतर आपआपल्या कर्मभूमीला परततात. बदलत्या सामाजिक परस्थितीमुळे ते वेगवेगळ्या तालुक्यात विखुरलेले असल्याने सर्वाना एकत्र येण्याचा विशेष योग येत नाही. गेल्या पाच वर्षापासून कराड तालुका नौसैनिक ग्रुप स्थापन करून तालुक्यातील विखुरलेल्या माझी नौसैनिकांना एकत्रित करण्यात आले त्यामुळेच “दो घास एस एन व्ही फॕमिली के साथ” या नावाने स्नेहमेळावा घेता आला. अशा माजी नौसैनिकांनी भावना व्यक्त केल्या. ते कराड येथे आयोजित स्नेहमेळाव्यात बोलत होते.
2024 च्या डिसेंबर मध्ये सर्वांनी एकत्रीत यावे या उद्देशाने “दो घास एस एन व्ही फॕमिली के साथ” हा कार्यक्रम सरत्या वर्षामध्ये कराड येथील हाॕटेल आलंकार येथे करण्यात आला होता.
कराड मधील अलंकार हॉटेल मधील कॉन्फरन्स हॉलमध्ये शाकाहारी व मांसाहारी जेवणाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास पंधरा वर्षापासून ते वय वर्ष 60 पर्यंत सर्विस केलेले वेगवेगळे नौसैनिक व अधिकारी सहकुटूंब उपस्थित होते.
कराड एस एन व्ही ग्रुप चा पुढील संकल्प म्हणजे, नौसैनिकांच्या मुलांना शैक्षणिक व आर्थिक दृष्ट्या मार्गदर्शन करणे तसेच एखाद्या नौसैनिकाचे आकस्मित निधन झाल्यास त्यासाठी पुढे काय उपाययोजना केल्या पाहिजेत याबाबतचे मार्गदर्शन करण्यात आले. आकस्मित निधन झालेल्या नौसैनिकाच्या घरी जाऊन महिलांना मार्गदर्शन करणे व त्यांना लागणाऱ्या आवश्यक त्या कागदपत्राची पूर्तता करणे हा या संघटनेचा उद्देश आहे. तसेच यापुढे सहकुटुंब सहल आयोजित करण्यात येणार असल्याचा मानस व्यक्त करण्यात आला. स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याचा मोठा वारसा असलेल्या कराड नगरीत हॉटेल अलंकार मध्ये सहकुटूंब स्नेहभोजनाचा स्वाद घेत रमलेल्या गप्पांत नौसैनिक तल्लीन होऊन गेले होते. यावेळी विष्णू घाडगे, जयवंत खांडे, शिवाजी धुमाळ, प्रभाकर कुलकर्णी, बी डी चिंचकर, राजेश कदम, प्रकाश निकम, गजानन पटवर्धन, अभिजित पटवर्धन, विठ्ठल जाधव, नारायण थोरात, शिवलिंग साबणे, अनिल पाटील आदी नौसैनिक सहकुटुंब उपस्थित होते.कराड तालुक्यातील तसेच आसपासचे माजी नौसैनिक व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
“दो घास एस एन व्ही फॕमिली के साथ” माजी नौसैनिकांचा कराडला स्नेहमेळावा उत्साहात पार पडला
RELATED ARTICLES