प
्रतिनिधी – धगधगती मुंबई वृत्तपत्र आणि सुयश सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या वतीने महायोगी गगनगिरी महाराज विद्यालय कापसेवाडी ता. जावली जि.सातारा येथील वस्तीगृहाच्या अनाथ मुलांना अन्नदान व शालेय वस्तू वाटप करण्यात आले .
तसेच सातारा जावळी महाबळेश्वर विभागातील पत्रकारांना शाल, पुष्प, सन्मानपत्र व लेखनी देऊन मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी शिवतुतारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष व राष्ट्रीय शिवव्याख्याते प्रा.रविंद्र पाटील सर कविता डॉट कॉमचे कवीवर्य शंकर गोपाळे नारायण लांडगे पाटील व सहकारी डी डी एम न्युज चॅनलचे संपादक भीमराव धुळप, सुयश सामाजिक शैक्षणिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रमेश संकपाळ सर विठ्ठल तोरणे,किसन शिंदे ,महायोगी गगनगिरी महाविद्यालयाच्या कार्यकारी विश्वस्त कविता पांचाळ मंडलेश्वर आंबानंदगिरी महाराजांचे उत्तराधिकारी राजेंद्र दादा पांचाळ, मुख्याध्यापक तरडे सर त्याचबरोबर सर्व पत्रकार बांधव आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक वर्ग उपस्थित होता.समाजाला आपण काहीतरी देणे लागतो ते देण्याचे दायित्व प्रत्येकामध्ये निर्माण व्हावं आणि अशा निराधार अनाथ मुलांना त्याचबरोबर जे मुलं आपल्या आई-वडिलांना वृद्धाश्रमामध्ये ठेवतात अशासाठी एक वेगळा उपक्रम ‘एक हात मदतीचा’ म्हणून धगधगती मुंबई वृत्तपत्र व सुयश सामाजिक शैक्षणिक संस्था नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
पत्रकार हा समाजाचा आरसा असतो, समाजामध्ये घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी बातमीच्या स्वरूपात प्रसिद्धी देऊन ते शासनाच्या वतीने मार्गी लावत असतो. अशा पत्रकारांचा सन्मान व्हावा व त्यांच्या सामाजिक विधायक कार्यास प्रेरणा मिळावी या उदात्त भावनेने स्थानिक पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.
सदर प्रसंगी कविता डॉट कॉम च्या सर्व टीमने अतिशय सुंदर अशा अप्रतिम कविता सादर केल्या यावेळी त्यांच्या प्रत्येक कवितेला सभागृहातील पत्रकार बांधवासह सर्वांनी उत्तम दाद दिली. भावनिक कवितांच्या सादरीकरणात काही श्रोत्यांचा डोळ्यात अश्रू तरळत होते असा बहारदार उपक्रम पार पडला . त्यानंतर दुपारच्या सत्रात विद्यार्थी स्फूर्तीदायक , प्रेरणादायी व चैनन्यमय असे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यशैली व जीवनातील प्रसंग – अपरिचित शिवराय या विषयावर प्रा. रविंद्र पाटील सरांचे व्याख्यान देखील संपन्न झाले.
प्रास्तविक सुयश शिक्षण संस्थेचे रमेश संकपाळ सर सुत्र संचालन राम शिंदे तर आभार प्रदर्शन धगधगती मुंबई वृत्तमिडियाचे संपादक भिमराव धुळप यांनी मानले.
एक हात मदतीचा…. धगधगती मुंबई वृत्तपत्र आणि सुयश सामाजिक शैक्षणिक संस्थेने पत्रकार दिनानिमित्त राबविले विविध उपक्रम
RELATED ARTICLES