Thursday, October 30, 2025
घरमहाराष्ट्रशनिवारपासून बोरीवली पूर्व येथे मालवणी महोत्सव ; कोकणी संस्कृती आणि खाद्यपदार्थांची मेजवानी

शनिवारपासून बोरीवली पूर्व येथे मालवणी महोत्सव ; कोकणी संस्कृती आणि खाद्यपदार्थांची मेजवानी

मुंबई, दि.३ जानेवारी (प्रतिनिधी) : मागाठाणे मित्र मंडळ आणि शिवसेना शाखा क्रमांक १४ तसेच १२ च्या संयुक्त विद्यमाने उद्या, शनिवार, ४ जानेवारी २०२५ पासून बोरीवली पूर्व येथील जय महाराष्ट्र नगर येथील कै. अनंतराव भोसले मैदानावर मालवणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी सायंकाळी ७.३० वाजतां परंपरेप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील दाभोली येथील श्री देव गिरोबा मंदिराच्या प्रतिकृती आणि बालनगरी व बाजारपेठेचे महा आरती तसेच पारंपारिक गाऱ्हाणे घालून उद्घाटन करण्यात येणार आहे. या मालवणी महोत्सवाचे यंदाचे २७ वे वर्ष असून रविवार, १२ जानेवारी २०२५ पर्यंत कोकणी संस्कृती आणि खाद्यपदार्थांची मेजवानी उपलब्ध होणार आहे. रोज सायंकाळी ७ वाजतां श्री देव गिरोबाची वाजंत्री तरंगासह पालखी आणि रात्री ८ वाजतां दशावतार नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहेत, अशी माहिती उत्सव प्रमुख नंदकुमार मोरे यांनी दिली.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments