Saturday, August 2, 2025
घरमहाराष्ट्रमहाराष्ट्र राज्य शिक्षकेतर सेना मुंबई विद्यापीठ संघटक प्रमुख पदी अमित साळुंखे नियुक्ती

महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर सेना मुंबई विद्यापीठ संघटक प्रमुख पदी अमित साळुंखे नियुक्ती

मुंबई(रमेश औताडे)  : विद्यार्थी चळवळी पासून सामाजिक कार्यात मागासवर्गीय शोषित वंचित दुर्बल गरीब घटकांच्या न्याय हक्कासाठी आदोंलन मोर्चे काढून या समाजाला सहकार्य करणारे अमित साळुंखे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मूळ शिवसेनेत प्रवेश करत धनुष्यबाण हाती घेतल्यानंतर त्यांना मूळ शिवसेना असलेल्या शिवसेना शिक्षकेतर कर्मचारी सेना मुंबई विद्यापीठ संघटक प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

शिवसेनेचे उपनेते व महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर कर्मचारी सेनेचे महाराष्ट्र संघटक अध्यक्ष अनिल पडवळ यांनी पक्षीय कार्यकारणीतील महत्वाचे असणारे असे शिवसेना शिक्षकेतर कर्मचारी सेना मुंबई विद्यापीठ संघटक प्रमुख पदी अमित साळुंखे ( बी ए, बी एड) यांची नियुक्ती केली आल्याने त्यांचे सर्व थरातून कौतुक होत आहे.

साळुंखे यांचे सहकारी अजय बरूचा, हर्षल पाटील, राजेश शर्मा, अरूणकुमार गुप्ता, अश्विन पाटणे, कपिल गौड, विजय गौड, कुणाल साळुंके, वसंत साळुंखे, विजय गौड तसेच अनेक पदाधिकारी यांनीही शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेतले आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments