मालवण :- कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातून महायुतीमधुन निलेश राणे यांनी शिंदे गटातून उमेदवारी मिळवत मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला आहे. निलेश राणे हे भाजप पक्षामध्ये सक्रिय होते. मात्र त्यांची वर्तणूक चांगली नसल्याने पक्षाची प्रतिमा मालिन होईल या भीतीपोटी भाजप पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारली होती.
उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांना ज्या भाजप पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आधार दिला. त्या भाजप पक्षाशी एकनिष्ठ न राहता केवळ आणि केवळ स्वतःच्या स्वार्थापोटी व उमेदवारीसाठी त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. मात्र शिंदे गटाचे कुडाळ-मालवणमध्ये मोजकेच कार्यकर्ते असल्यामुळे भाजप पक्षाची कुडाळ -मालवणमध्ये ताकत असून देखील भाजपच्या वाट्याला हा मतदारसंघ न आल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी देखील पाठ फिरवल्यामुळे निलेश राणे यांनी शक्ती प्रदर्शन करणे टाळले आहे. अशी दबक्या आवाजात कुडाळ-मालवणमध्ये चर्चा रंगली आहे.