सातारा(अजित जगताप) : नैसर्गिक वरदान लाभलेल्या सातारा जिल्ह्यातील धोम, कोयना, कण्हेर आणि उरमोडी धरण प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये राजकीय आश्रयाने अनधिकृत बांधकामे झाले . कामांवर तातडीने कारवाईसाठी पर्यावरण कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी ॲड. तृणाल टोणपे, ॲड. निकिता आनंदाचे यांच्या मार्फत कायदेशीर नोटीस सातारा जिल्हाधिकारी, मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, सहाय्यक वनसंरक्षक तसेच पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय यांना पाठवली आहे.
धरणांच्या संरचनेच्या सुरक्षिततेसह पर्यावरणीय हानी, सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. तसेच पर्यावरण सुरक्षिततेसाठी असणाऱ्या सरकारच्या नियमांचे गंभीर उल्लंघन झाल्यामुळे ही नोटीस दिल्याची माहिती पर्यावरण कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी दिली.

नोटीस मध्ये जी पर्यावरणीय कायद्यांचे उल्लंघन करून आवश्यक परवानग्या न घेता बांधली गेली आहेत. ही मालमत्ता धरणांच्या सर्वाधिक पुर पातळीच्या जवळच्या क्षेत्रात स्थित असून, हॉटेल वासोटा, हॉटेल रिव्हरसाइड, हॉटेल विरासात ,हॉटेल मॅग्नस हॉटेल नक्षत्र, सह्याद्री बोट क्लब, जोगळेकर वाडा, मानकुमरे वाडा, कृष्णा रिव्हर कॅम्प, हॉटेल रिव्हाइव्ह, जलसागर ढाबा आणि अन्य स्थळांचा समावेश आहे. या बांधकामांमुळे सार्वजनिक सुरक्षेला मोठा धोका व पर्यावरणाचे नुकसान झाले आहे, सांडपाणी थेट जलाशयांमध्ये सोडणे आणि कचरा व्यवस्थापनाच्या नियमांचे उल्लंघन झाले .
श्री. मोरे यांनी २०२२ पासून अनेक तक्रारी केल्या पण ठोस कारवाई झाली नाही. त्यामुळेच तर राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण (NGT) कडे पुढील कायदेशीर कारवाईसाठी धाव घेणार असल्याचे सुशांत मोरे यांनी सूचित केले आहे.