

प्रतिनीधी: संगम प्रतिष्ठान चां एक नवा अनोखा उपक्रम धारावीतील नवरंग सोसायटी कंपाऊंड येथे टाकाऊ पासून टिकाऊ हा उपक्रम राबण्यात येत आहे.
सहाय्यक आयुक्त जी.उत्तर विभाग आणि घन कचरा व्यवस्थापन खात्याच्या मार्गदर्शनात धारावी स्थित सुका कचरा वर्गीकरण केंद्रावर नवनवे उपक्रम आणि जनजागृतीचे उपक्रम नेहमीच सुरू असून,कचर्यामध्ये येणाऱ्या काचा/बॉटल वर्षानुवर्ष रिसायकल साठी पाठविल्या जातात.
मात्र संगम प्रतिष्ठान च्या सचिव कोमल घाग आणि पर्यावरण मित्र तानाजी घाग यांनी काचेच्या टेक्निशियन च्या सहकार्याने ड्राय वेस्ट सेंटर वर येणाऱ्या दारूच्या टाकाऊ बॉटल जमा करून त्या पूनर्वापरात आणण्यासाठी चा नवा उपक्रम सुरू केला आहे.
दारूच्या अँटीक बॉटल आणि बियर च्या बॉटल पासून कार्पोरेट काचेचे कप,टेबल ल्यांप,टेबल पेपर वेट,पेन स्टयांड यासहित विविध वस्तू बनविण्याचा ध्यास घेतला असून.ड्राय वेस्ट सेंटर वरील टाकाऊ काचांपासून यापुढे विविध लोकउपयोगी वस्तू बनविण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे कोमल घाग यांनी सांगितले.
या कामी प्रशासनाकडून पाठीवर थाप आणि प्रोत्साहन मिळाल्यास हे मॉडेल मनपा च्या जी.उत्तर विभागासाठी आणि संगम प्रतिष्ठान साठी एक अभिनव मॉडेल ठरेल.
स्वच्छता पंधरवड्यात २ ऑक्टोबर रोजी ड्राय वेस्ट सेंटर वर येणाऱ्या सुक्या कचर्या सोबत च्या वोल्या कचऱ्यावर संगम प्रतिष्ठान ने सुरू केलेला खत प्रकल्प असो की काचेच्या टाकाऊ बॉटल पूनरवापरात आणण्यासाठी सुरू होत असलेला नवा उपक्रम असो.सतत कचऱ्यातून सृजनशील प्रयोग सुरू असल्याने स्थानिकांमध्ये मनपा जी.उत्तर विभाग घन कचरा व्यवस्थापन खात्याबद्दल कुतूहल निर्माण झाले आहे.