Wednesday, September 10, 2025
घरमहाराष्ट्रजुईनगर येथे शासनाची अंगणवाडी जागेविना उपेक्षित

जुईनगर येथे शासनाची अंगणवाडी जागेविना उपेक्षित


प्रतिनिधि : अंगणवाडी केंद्र क्रमांक १६९ जुईपाडा च्या संचालिका सध्या अंगणवाडी साठी जागेच्या शोधात आहे परंतु जागा मिळेनाशी झाली आहे. जुईनगर सेक्टर २३ च्या माजी नगरसेविका तनुजा मढवी याच्या प्रयत्नातून सेक्टर २३ मधील भूखंड क्रमांक ६७ए वर बहूउद्देशीय इमारत बनवताना तेथे लशीकरण व अंगणवाडी साठी जागा ठेवायचे ठरले होते, परंतु तेथे अंगणवाडी साठी पालिकेकडून जागा उपलब्ध केली नाही त्यामुळे अंगणवाडी संचालिकेला आता अंगणवाडीसाठी कुठे जागा मिळते का ते शोधत असताना त्यांनी जुईनगर येथील महानगर पालिकेच्या शाळा क्रमांक १७ च्या मुख्याध्यापकांची भेट घेतली व त्यांना पहिल्या माळ्यावर मोकळी असलेली एक रुम देण्याची लिखित स्वरूपात विनंती केली पण सादर मुख्याधापक नेहमी प्रमाणे खाजगी मालमत्ता असल्या सारखे वागतात त्यामुळे त्यांनी अंगणवाडी साठी जागा देण्यास नकार दिला. आता अंगणवाडी संचालिकेला अंगणवाडी भरवता येत नाही असे दिसते.
शासनाची अंगणवाडी असताना त्यांना पालिकेच्या शाळेत जागा मिळणे क्रम प्राप्त होते परंतु शाळा क्रमांक १७ जुईनगरचे मुख्याधापक यांच्या आडमुठे व अडवणुकीच्या धोरणामुळे अंगणवाडी संचालिके कडे असलेल्या २० बालकांचे भवितव्य सध्यातरी अंधारात सापडलेले आहे. कोणी दानशूर व्यक्ती आपला एकादा गाळा दर दिवशी दोन तासांसाठी देतोय का त्याचा शोध सदर संचालिका घेत आहे. पालिकेच्या शिक्षण विभागाची मर्जी असल्यामुळे सादर मुख्याध्यापका पुढे कोणाचेच चालत नाही हि वस्तूस्थिती आहे.
अंगणवाडीच्या मुलांचे पालक देखील या प्रसंगाने भांबावून गेले आहेत व आपली छोटी छोटी मुले कुठे तरी बसवतील याची त्यांना चिंता लागली आहे व ते आता पालिकेचे आयुक्त तसेच समाज विकास विभागाचे अधिकारी सदर मुख्याध्यापकांवर काही कारवाई करतात का या प्रतीक्षेत आहेत.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments