Wednesday, September 10, 2025
घरमहाराष्ट्रजयश्री थोरातांबद्दल वापरलेली भाषा हीच आरएसएस-भाजपावाल्यांची महिलांबद्दलची मानसिकता- खा. वर्षा गायकवाड

जयश्री थोरातांबद्दल वापरलेली भाषा हीच आरएसएस-भाजपावाल्यांची महिलांबद्दलची मानसिकता- खा. वर्षा गायकवाड

मुंबई : काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्याबदद्ल भाजपाचा माजी खासदार सुजय विखे पाटलांच्या संगमनेर येथे झालेल्या सभेत भाजपाचा पदाधिकारी वसंत देशमुख याने अत्यंत गलिच्छ भाषा वापरुन तिच्या चारित्र्यावरही शिंतोंडे उडवण्याचा अश्लाष्य प्रकार केला. जयश्री थोरातांबद्दल वापरलेली भाषा हीच आरएसएस-भाजपावाल्यांची महिलांबद्दलची मानसिकता आहे,अशी संतप्त प्रतिक्रिया देत भाजपाच्या या निच मानसिकतेला विधानसभा निवडणुकीत माताभगिनींनी घरी बसवावे, असे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खा. वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.

भाजपाचा पदाधिकारी वसंत देशमुखाने जयश्री थोरात यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा तीव्र निषेध करत खा. वर्षा गायकवाड म्हणाल्या की, भारतीय जनता पक्ष युती सरकार एकीकडे लाडकी बहिण म्हणून महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करत असल्याचा दावा करते पण त्यांची महिलांबद्दलची मानसिकता काय आहे हेच संगमनेरच्या सभेत दिसले.वसंत देशमुखानी जयश्रीबद्दल जी भाषा वापरली तीच मनुवादी विकृत्ती आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अजित पवार यांना जयश्री थोरातांबद्दल वापरलेली भाषा मान्य आहे का, ते या विधानाचे समर्थन करतात का, याचा खुलासा करावा व जयश्री थोरात यांचा अपमान केल्याबद्दल राज्यातील महिलांची जाहीर माफी मागावी तसेच वसंत देशमुख व माजी खासदार सुजय विखेंवर सुद्धा कारवाई करावी अशी मागणी वर्षा गायकवाड यांनी केली आहे.

महिला आज राजकारणासह सर्वच क्षेत्रात स्वतःच्या कर्तृत्वाने आपला ठसा उमटवत आहेत हेच भाजपाच्या विकृत लोकांच्या पचनी पडत नाही. महिलांबद्दलची हिन प्रवृती याआधीही अनेकदा दिसून आलेली आहे. काँग्रेसची विधवा, ५० करोड की गर्लफ्रेंड, दिदी ओ दिदी, शर्पूणखा ही भाषा देशाच्या पंतप्रधानानेच महिलांबद्दल वापरली तीच भाषा त्यांचे चेलेचपाटे वापरत आहेत. महिलांचा अपमान करून त्यांच्या चारित्र्यावर बोलून महिला गप्प बसतील असे जर या लोकांना वाटत असेल तर ते मुर्खाच्या नंदनवनात रहात आहेत. सावित्रिबाईंच्या राज्यातच महिलांबद्दल अशी गरळ ओकली जाते हेच दुर्दैवाचे आहे असे वर्षा गायकवाड म्हणाल्या.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments