Wednesday, September 10, 2025
घरमहाराष्ट्रशासनाच्या शेतीमित्र पुरस्काराबद्दल डाॅ.संदीप डाकवे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव

शासनाच्या शेतीमित्र पुरस्काराबद्दल डाॅ.संदीप डाकवे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव

प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य शासनाच्या कृषि विभागाचा पत्रकारितेचा सर्वोच्च वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार मिळाल्याबद्दल पाटण तालुक्याचा अभिमान ठरलेले डाकेवाडी (काळगांव) येथील डाॅ.संदीप डाकवे यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून, फोन, मेसेज, व्हाॅटसअप, इन्स्टाग्राम तसेच सोशल मिडीयाव्दारे डाॅ.डाकवे यांच्या कर्तृत्वाचे मनापासून कौतुक केले आहे.
तळमावले (ता.पाटण) येथे शिवसमर्थ परिवाराच्यावतीने शाल, बुके व श्रीफळ देवून डाॅ.संदीप डाकवे यांचा सत्कार शिवसमर्थ समुहाचे कुटूंबप्रमुख अॅड.जनार्दन बोत्रे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष शिवाजी सुर्वे, सीईओ हेमंत तुपे, सुनील ढेंबरे, व्यवस्थापक नितीन पाटील, देवबा वायचळ व शिवसमर्थ मुख्य कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
आधार फौंडेशनचे रामभाऊ कोळेकर यांनी फ्रेम देवून डाॅ.संदीप डाकवे यांचा सत्कार आई गयाबाई डाकवे, रेश्मा डाकवे, पायल कोळेकर, रोहित पवार, अक्षता निवडूंगे, पुजा निकम, स्पंदन डाकवे, सांची डाकवे, साईशा कोळेकर व मान्यवरांच्या उपस्थितीत केला.
वरची शिबेवाडी, गुढे (ता.पाटण) येथील श्री काळंबादेवी चॅरिटेबल ट्रस्ट आणि ग्रामस्थ मंडळ यांनी डाॅ.संदीप डाकवे यांचा सपत्नीक सत्कार करताना फ्रेम आणि शाल, श्रीफळ देवून सन्मान केला.
प्रल्हादराव साळुंखे (सचिव, सह्यगिरी शिक्षण संस्था, आगाशिवनगर, मलकापूर) यांनी बुके देवून डाॅ.संदीप डाकवे यांचा सन्मान केला. यावेळी शशीकांत मत्रे (मुख्याध्यापक, वाल्मिकी विद्यालय, डावरी भालेकरवाडी), भरत पाटील (व्यवस्थापक, कराड पाटण माध्यमिक सेवकांची पतसंस्था, कराड), जीवन पाटील (अध्यक्ष, सातारा पत्रकार संघ,सातारा) उपस्थित होते.
राजाभाऊ काळे (माजी सदस्य, जिल्हा नियोजन समिती सातारा), ज्येष्ठ संपादक संपत देसाई, मित्र जर्नादन सुतार, सुनील पवार (चाफळ), सेवानिवृत्त पोलिस अधिकारी अनिल पाटील, कृष्णाकाठचे संपादक चंद्रकांत चव्हाण, सौ.जयश्री चव्हाण, युवा गीतकार, संगीतकार महेश मस्कर, प्रतिनिधी राजेंद्र पुजारी, आयुर्वेदाचार्य चे राहुल बडेकर, शिवम असोसिएटस चे गुलाब जाधव आणि कुटूंबीय यांनीही बुके, शाल देवून डाॅ.संदीप डाकवे यांचा सन्मान केला. या सर्वांनी डाॅ.डाकवे यांना वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन करुन भावी वाटचालीस शुभेेच्छा दिल्या.
लोकांनी मोठया प्रमाणात केलेल्या सत्कार आणि स्वागतामुळे यापुढे लिखाणासाठी आणखी ऊर्जा आणि प्रेरणा मिळाली आहे. तसेच समाजाप्रती काम करण्याची जबाबदारीही वाढल्याची प्रतिक्रिया डाॅ.संदीप डाकवे यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments