Wednesday, September 10, 2025
घरमहाराष्ट्रमुंबई महानगर पालिका आयुक्त भूषण गगराणी यांचा कामगार,कर्मचारी अधिकारी यांच्याशी थेट संवाद..!...

मुंबई महानगर पालिका आयुक्त भूषण गगराणी यांचा कामगार,कर्मचारी अधिकारी यांच्याशी थेट संवाद..! कामगारांच्या दैनंदिन,कायम,तसेच आस्थापना इत्यादी अनेक प्रश्नांवर चर्चा


मुंबई :  कामगाराच्या दैंनदिन,कायम,तसेच आस्थापना इत्यादी अनेक प्रश्नाबाबत मनपा आयुक्त  भूषण गगराणी यांनी छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर दादर,मुंबई या ठिकाणी मुंबई महानगर पालिकेतील घकव्य खात्यातील कामगार,मुकादम,कनिष्ठ पर्यवेक्षक, पर्यवेक्षक,समुप,तसेच आस्थापना विभागातील कर्मचारी, अधिकारी इत्यांदीशी अनेक प्रश्नांवर थेट संवाद साधून सर्वं कर्मचारी वृंदांचे समाधान केले.
मनपा आयुक्त श्री भूषण गगरानी यांनी अशा प्रकारचा संवाद साधून महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवून मनपाच्या इतिहासात असे प्रथमच घडले आहे,त्यामुळे आयुक्त श्री भूषण गगरणी यांच्याबद्दल कर्मचारी वृंदांमध्ये कौतुकाची चर्चा होतांना ऐकायला मिळत आहे.
कामगारांच्या रजा, पिटी केस, सेवानिवृत्तीचे दावे, कामगारांच्या नादुरुस्त चौक्या तेथील प्राथमिक सुविधा,स्टाफ कवार्टर,तसेच इतर प्रलंबित असणारे घकव्य खात्यातील अनेक विषांयावर या सुसंवाद मध्ये चर्चा घडवून आणली गेली.
आतापर्यंत युनियन मार्फत अनेक समस्या सोडविण्याचे अनेक प्रयत्न झाले
परंतू पहिल्यांदाच मनपाच्या इतिहासामधे मा.आयुक्त महोदयांनी अशा प्रकारे घकव्य खात्यातील कामगारांच्या दुर्लक्षित ,प्रलंबित समस्या तसेच प्रश्नांना वाचा फोडण्याचे प्रयत्न सुसवांदाच्या माध्यमातून केले गेले.

सफाई कामगार हा दुर्लक्षित असला तरी मुंबईच्या स्वच्छतेसाठी तो आमच्यासाठी अभिमान आहे असे गौरोदगार मा.आयुक्त यांनी काढले.
स्वच्छतेमुळे शहराचे आरोग्य चांगले ठेवता येते,पर्यावरण उत्तम ठेवता येते तसेच स्वतःबरोबर कुतुंबाचे सुद्धा आरोग्य
सफाई कामगार उत्तम ठेवू शकतो
म्हणून सफाई कामगार हा महत्वाचा घटक आहे असे आयुक्त मोहदय म्हणाले.
सफाई कामगारांना विविध सुविधा,आर्थिक मदत,तसेच कामातील इतर सुविधा प्राप्त करून देण्यासाठी आम्ही सर्व अधिकारी वचन बद्ध आहोत असे बोलून सर्वं कामगारांना मा. आयुक्त मोहदयानी शुभेच्छा दिल्या.
कर्मचारी सुसवांदामध्ये अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी, उपायुक्त (घकव्य) किरण दिघावकर,झोन २ चे उपायुक्त प्रशांत सपकाळे, जी उत्तर सहाय्यक आयुक्त श्रीअजितकुमार आंबी, मुख्य अभियंता श्रीतायशेटे, श्री परकाळे मुख्य पर्यवेक्षक श्री प्रमोद सांगळे इत्यादी आणि अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
तसेच २४ विभागातील कामगार,मुकादम,पर्यवेक्षक
समुप आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने केली.
कार्यक्रम शेवटी उपस्थितांना जेवणाची सोय झाल्यामुळे कर्मचारी वृंद खुश होवून आपापल्या विभात आनंदाने निघून गेले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments