मुंबई : राज्यातील दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक, बेरोजगार, नोकरीतील आरक्षण आदी महत्वाचे प्रश्न घेऊन भारतीय राजकीय काँग्रेस पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरला असून १६ उमेदवारांची पहिली यादी बुधवारी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत जाहीर केली.
स्वबळावर निवडणूक लढविणार असून उर्वरीत ठिकाणी समविचारी पक्षांच्या उमेदवारांना पाठींबा देण्यात येणार आहे. असे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजेश सोनवणे यांनी सांगितले.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ई. आनंद यांनी पक्षाचे अधिकृत उमेदवार जाहीर केले. (१) मालाड पश्चिम- जोसेफ चेट्टी (२) माहिम जॉन अल्बर्ट नोरोना, (३) जळगांव ग्रामीण चैतन्यनन्नवरे, (४) जळगांव शहर – अशोक डोंगरे, (५) भुसावळ (अ.जा. राखीव बापु सोनवणे (६) जोगेश्वरी (पूर्व) – शकील अहमद शेख, (७) भांडूप (पूर्व) कारके मैग्लो (८) मुंब्रा- फराहन आझमी, (९) नागपूर – शेख फरास, (१०) मालाड (पूर्व) सिनसेन नाडार (११) कल्याण (पूर्व)- अनंत भिमराव कर्पे, (१२) अनुशक्ती नगर सुरेश मोरे (१३) शिवाजीनगर प्रमोद निकम, (१४) भांडूप (प.) परशुराम माने, (१५) घाटकोपर (पूर्व) अझरोदीन काझी, (१६) उल्हासनगर – मोहम्मद रफिक खान. या १६ विधानसभा मतदार संघाची पहिली यादी जाहिर करण्यात आली आहे.यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष युवा जोसेफ चेट्टी, प्रमोद निकम आदी पदाधिकारी उपस्थित होते.