मुंबई : बालकांमधील कुपोषणाशी लढा देण्याच्या उद्देशाने एक उल्लेखनीय उपक्रम राबवत अक्षय चैतन्य सामाजिक संस्थेच्या वतीने “बाऊल ऑफ ग्रोथ प्रोग्राम” सुरू करण्यात येत आहे. हा कार्यक्रम बालवाडीतील (प्री-स्कूल) १००० मुलं आणि मुंबईतील प्राथमिक शाळांमधील ३००० मुलांचे ६ महिन्यांकरिता पोषणासाठी तयार केले आहे. मुंबईच्या शहरी झोपडपट्ट्यांमधील ४ ते १४ वर्षांच्या मुलांमध्ये कुपोषण दूर करण्यासाठी फोर्टिफाइड मल्टीग्रेन(मिश्र धान्य) आणि बाजरी सारख्या धान्याचा समावेश असलेले पदार्थ पुरविले जातीत.

पेप्सिको फाउंडेशनने कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) कार्यक्रमांतर्गत या उपक्रमाला पाठिंबा दिला आहे. मुंबईतील निवडक बालवाडी आणि महापालिका शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
मुंबईत झालेल्या या कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी प्राची जांभेकर(मुंबई उपायुक्त), राजेश कंकाळ(प्राथमिक शिक्षणाधिकारी), श्रीमती छाया साळवे (शिक्षण अधीक्षक), मुख्तार शाह (उपशिक्षणाधिकारी , प्रभाग प्रशासन अधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक आणि बालवाडी समन्वयक उपस्थित होते.
मुंबईच्या शहरी झोपडपट्टी परिसरातील सर्वेक्षणानुसार ४०% मुलांची वाढ खुंटलेली आहे आणि १४% मुलं ही गरीबी, पुरेसे अन्न आणि मर्यादित आरोग्य सुविधांमुळे कमी वजनाची आहेत. या कार्यक्रमाच्या अशा मुलांच्या पोषणाबाबत पुरेपुर काळजी घेतली जाणार आहे. पूरक आहाराव्यतिरिक्त यामध्ये बाल आरोग्य, पोषण आणि स्वच्छतेविषयी सवयींबाबत जागरुकता निर्माण केली जाणार आहे. ४ ते ५ वर्षांच्या बालवाडीतील मुलांची वाढ आणि आरोग्याच्या मापदंडांचे मूल्यांकन करण्यासाठी दर तीन महिन्यांनी मूल्यमापन केले जाईल. ६ते १४ वर्षे वयोगटातील शाळकरी मुलांसाठी, ॲंथ्रोपोमेट्रीक (शरीरशास्त्राचा अभ्यास) आणि ॲनिमिया तपासणी ही नॉन-इनवेसिव्ह एआय टूल्स वापरून केली जाईल. २ ते ४ महिन्यांच्या अंतरानंतर ही तपासणी पुन्हा केली जाईल, अशा माहिती अक्षया चैतन्यचे सीईओ विकास परचंदा यांनी दिली.