प्रतिनिधि : वसई विरार मधे असंघटित,घरेलू,बांधकाम मंजूर महिलांची संघटना असणारी राष्ट्रमाता जिजाऊ महिला जनरल कामगार संघटनेचा प्रथम वर्धापन दिन वसई पूर्व येथील उडपी हॉल येथे शेकडो महिला कामगारांच्या उपस्तिथीत संपन्न झाला.महिलांच्या विविध प्रश्नांवर,हक्कांवर,अधिकारांवर चर्चा आणि मार्गदर्शन करण्यासाठी विविध वक्ते बोलावण्यात आले होते.महिलांना वकिली सल्ला सोबत कोणत्याही प्रकरणात मोफत वकिल पुरवण्याची घोषणा या मेळाव्यात करण्यात आली.ऍड आदेश बनसोडे,ऍड.आकांशा वर्मा,ऍड.भक्ती दांडेकर व संघटनेचे सचिव ऍड.अनिल चव्हाण ह्यांनी कामगार कायदे व महिलांना उपलब्ध इतर कायद्यांवर चर्चा व मार्गदर्शन केले.महिलांच्या मानसिक आजारावर कॉऊन्सिलर साहिली खोत यांनी मार्गदर्शन केले.महिलांना स्वयं रोजगारासाठी उपलब्ध असणाऱ्या संधी व सरकारी अनुदान यावर श्री विकास मोरे यांनी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या उपनेत्या व माविम च्या अध्यक्षा श्रीमती ज्योतीताई ठाकरे उपस्तिथ होत्या त्यांनी महिलांना मार्गदर्शन केले.संघटनेच्या अध्यक्षा सौ नम्रता वैती यांनी महिलांसाठी हेल्पलाईन नंबर असावे या संकल्पनेतून संघटनेचा हेल्पलाईन नंबर चे उदघाटन केले.तसेच अनेक महिलांना संघटनेचे पद वाटप करण्यात आले.या कार्यक्रमात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पालघर जिल्हाप्रमुख श्री अनुप पाटील,श्री.अजय ठाकूर ,प्रवक्ते राधेशाम पाठक,काका मोटे,दिलीप चेन्दवणकर,विश्वास किणी व अनेक पदाधिकारी उपस्तिथ होते.सर्वांचे आभार संघटनेच्या अध्यक्षा सौ.नम्रता वैती यांनी मानले
