Thursday, September 11, 2025
घरमहाराष्ट्रशाहू नगरीत पाण्यासाठी नागरिकांची मतदानापूर्वीच रांगा

शाहू नगरीत पाण्यासाठी नागरिकांची मतदानापूर्वीच रांगा

सातारा(अजित जगताप) : सातारा शहर मध्यवर्ती भाग म्हणजे शाहू नगरी आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सातारा जिल्हा नव्हे तर इतर जिल्ह्यातूनही आलेल्या लोक स्थायिक झालेले आहेत. सध्या विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत विकासाची स्वप्न दाखवत असतानाच मतदानापूर्वीच पाण्यासाठी रांगा शाहू नगरीत जागोजागी दिसत आहे. नेमकं मतदान कोणाला? याचीच आता चांगली चर्चा रंगू लागलेली आहे. सातारा नगरपालिकेने विकास कामांमध्ये खूप मोठे योगदान दिले आहे. ते कधीही विसरता येणार नाही. हे लक्षात ठेवूनच मतदान होणे गरजेचे आहे. लोकांना नागरी सुविधा देण्यासाठी सातारा नगरपालिका कटिबद्ध आहे. हे काही जाहिरातीबाजीतून लोकांपर्यंत पोहोचते. परंतु, लोकांना नागरी सुविधांसाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ येते. हे विदारक चित्र समतेचा नारा देणाऱ्या छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने निर्माण झालेल्या शाहू नगरीत काही नाही विधानसभेच्या तोंडावर पाहण्यास मिळत आहे. या शाहूनगरी परिसरात सामाजिक कार्यकर्ते ते विविध क्षेत्रांमध्ये नावलौकिक प्राप्त केलेले अनेक जण राहतात. परंतु ,त्यांना पाण्यासाठी रिकामी भांडी घेऊन रस्त्यावर येणे सुद्धा अवघड बनले आहे. विकतचे पाणी घेण्यासाठी लोकांना रांगेत उभे राहावे लागते. पाणीपुरवठा करण्यासाठी दिवस रात्र झटणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयाच्या आवारापासून शाहू नगरी सुरू होते. त्या ठिकाणी लोकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर सातारा भाजपचे खासदार व आमदार यांनी अनेक मेळावे घेतले. या मेळाव्यांसाठी शाहूनगरी येथील अनेक कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. महायुतीच्या उमेदवाराचे मताधिक्य वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतानाच गेले चार दिवसापासून शाहू नगरीला पाणी मिळत नसल्याने मतदान नेमके कुणाला करावे? असा प्रश्न येतील नागरिकांना पडलेला आहे. सत्ताधारी व विरोधक खरं म्हणजे लोकशाहीतील दोन महत्त्वाचे घटक असून सुद्धा शाहूनगरीच्या नागरिकांसाठी कुणीही पाणी घेऊन आलेले नाही. एकेक काळी सातारा जिल्ह्यातील माण खटावच्या दुष्काळग्रस्तांना नशिबाला दोष द्यावे लागत होते. आता ही परिस्थिती शाहू नगरीत पाहण्यास मिळत असल्याने विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर सुज्ञ नागरिक व मतदार यांनी किमान नागरी सुविधा देण्याच्या मागणीसाठी तरी मतदानासाठी बाहेर पडावे. अशी मागणी होऊ लागलेली आहे. दरम्यान, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेमध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे .दुरुस्तीसाठी युद्ध पातळीवर दुरुस्तीचे काम होत असल्याचे काही नागरिकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. त्यामुळे खाजगी पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरच्या फेऱ्या वाढल्याचे दिसून येत आहे. लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे आले. त्याची संपूर्ण शाहूनगरीमध्ये अनेकांनी कौतुक केले. परंतु पिण्याच्या पाण्यासाठी आता रिकामी भांडी घेऊन त्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे. असे अनेक माता भगिनींनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments