Sunday, September 21, 2025
घरमहाराष्ट्रनिवडणुकी दरम्यान राज्यात सात दिवस ड्राय डे

निवडणुकी दरम्यान राज्यात सात दिवस ड्राय डे

मुंबई – राज्यातील विधानसभा निवडणुका २० नोव्हेंबरला एकाच टप्प्यात होणार आहेत,तर २३ नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचे निकाल लागणार आहेत. आता निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच,नोव्हेंबर महिन्यांमध्ये महाराष्ट्रातील ड्राय डे ही वाढले आहेत. नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रातील ड्राय डेचे ७ दिवस झाले आहेत.

महाराष्ट्रात १ नोव्हेंबरला दिवाळीनिमित्त, १२ नोव्हेंबरला कार्तिकी एकादशीनिमित्त तर १५ नोव्हेंबरल गुरू नानक जयंती निमित्त ड्राय डे आहे. तर १८ नोव्हेंबरला संध्याकाळी ५ वाजल्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावतील,तेव्हापासून ते २० नोव्हेंबरला मतदान पार पडेपर्यंत राज्यातील दारूची दुकानं बंद राहतील.२३ नोव्हेंबरला निवडणुकीचे निकाल असल्यामुळे त्यादिवशीही ड्राय डे असेल. दरम्यान,राजकीय पक्षांनी आणि उमेदवारांनी मतदारांना लाच देण्यासाठी दारूचा वापर करू नये, यासाठी निवडणूक आयोगाने मतदानाच्या ४८ तास आधी म्हणजेच २ दिवस आधी ड्राय डे घोषित करण्याचा नियम केला आहे.या नियमानुसार मतदारांना आमिष म्हणून दारू सेवन आणि वितरण रोखण्यासाठी दारूची दुकाने बंद ठेवली जातात

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments