पाटण : महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांना पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील शेतीमित्र डाॅ.संदीप डाकवे यांनी अक्षरगणेशाची कलाकृती भेट दिली. डाॅ.डाकवे यांचेकडून भेट दिली जाणारी 15,000 वी कलाकृती आहे. याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषि मंत्री धनंजय मुंडे, आ.अमर काळे, कृषि आयुक्त रविंद्र निबवडे भा.प्र.से., कृषि सचिव जयश्री भोज भा.प्र.से, रेश्मा डाकवे व अन्य मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात हा योग जुळून आला. कार्यक्रमाची वेळ अत्यंत काटेकोर होती, त्या वेळेतही डॉ. डाकवे यांनी राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना अक्षर गणेशा भेट दिले. राज्यपालांनी डॉ.डाकवे यांचे कौतुक केले. तर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी राज्यपालांना डॉ.संदीप डाकवे यांच्या कलेची माहिती देत शाबासकी दिली.
डाॅ.संदीप डाकवे यांनी आतापर्यंत विविध क्षेत्रातील दिग्गजांना अक्षरगणेशा, शब्दचित्रे, स्केचेस, कविता इ. भेट दिल्या असून त्याची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली गेली आहे. अनेकांना त्यांच्या कलेची भुरळ पडली आहे. डाॅ.संदीप डाकवे यांनी कलेच्या माध्यमातून मिळणाऱ्या मानधनातील काही रक्कम गरजूंना दिली आहे. डॉ. डाकवे राबवत असलेल्या विविध कलात्मक उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत असते.
