ताज्या बातम्या

महापालिका जी/उत्तर विभागामध्ये सखोल स्वच्छता मोहीम यशस्वी संपन्न!

प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिका उपायुक्त  सपकाळे साहेब यांच्या आदेशान्वये तसेच जी/उत्तर विबगग सहाय्यक आयुक्त  अजितकुमार आंबी यांच्या मार्गर्शनाखाली तर भोईर सहाय्यक अभियंता घकव्य खाते यांच्या प्रमुख उपस्थितीत जी उत्तर विभागामध्ये सेनापती बापट रोडवर केशव सुत उड्डाणपूल ते एल्फिन्स्टन उड्डाणपूल पर्यंत सखोल स्वच्छता अभियान शनिवार दि. ५/१०/२०२४ रोजी सका.७.३० ते १२.०० वाजेपर्यंत राबविण्यात आले.

या अभियानामध्ये घकव्य खाते यांचे मोठ्या प्रमाणात कामगार,क.पर्यवेक्षक पर्यवेक्षक,समुप इत्यानी सहभाग घेतला होता.

या अभियानामध्ये नासिक शिर्डी येथील बसस्टॉप परिसरातील ऑड अँड आर्टिकल, माती, डेब्रिज,कचरा इत्यादी मोठ्या प्रमाणात उचलून परिसर स्वच्छ करण्यात आला.

 विशेषत: या अभियानामध्ये वाहतूक पोलिस दादर यांनी अनधिकृतपणे उभी असणारी वाहने हटवल्यामुळे अभियान यशस्वी करण्यास मदत झाली. सखोल स्वच्छता अभियान यशस्वी करण्याकरिता कीटक नियंत्रण खाते, मलनिःसारण,पावसाळी जाळी,गार्डन इत्यादी खात्यातील कर्मचाऱ्यांनी उत्साहाने सहभाग घेउन परिसर स्वच्छ करण्यात मदत केली होती.

ज्या ज्या कामगार  कर्मचारी,अधिकारी यांनी या मोहिमेमध्ये सहभाग घेऊन हे अभियान यशस्वी केले अशा सर्वांना धन्यवाद देऊन सर्वांचे  भोईर यांनी कौतुक केले.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top