Sunday, September 21, 2025
घरमहाराष्ट्रपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ठाणे दौऱ्याच्या अनुषंगाने जड व अवजड वाहनांना वाहतूक...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ठाणे दौऱ्याच्या अनुषंगाने जड व अवजड वाहनांना वाहतूक विभागाकडून ठाणे शहरात प्रवेश बंदी

ठाणे:- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि.5 ऑक्टोबर 2024 रोजी वालावलकर सभा मैदान, बोरीवडे गाव, कासारवडवली, घोडबंदर रोड, ठाणे (प.) येथे 33 हजार कोटी रुपयांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांचे ऑनलाईन भूमीपूजन व उद्घाटन तसेच “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” या योजनेच्या महिला लाभार्थ्यांचा प्रातिनिधीक स्वरूपात सत्कार सोहळा पार पडणार आहे. त्यानुषंगाने ठाणे शहरात खारेगांव टोलनाका आणि कशेळी टोलनाका मार्गे ठाणेकडे जाणाऱ्या सर्व जड व अवजड वाहनांना आज शुक्रवार, दि.4 ऑक्टोबर रात्री 12:01 वाजेपासून ते शनिवार, दि.5 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत प्रवेश बंदी जाहीर करण्यात आली आहे. तरी सर्व ट्रान्सपोर्ट / वेअर हाऊस संघटना / वाहनचालक व मालक यांनी या आदेशाची नोंद घ्यावी, असे वाहतूक विभाग, ठाणे शहर यांनी कळविले आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments