Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रचारशे वर्षांची परंपरा लाभलेल्या माटुंग्याच्या मरूबाईचा नवरात्रोत्सव

चारशे वर्षांची परंपरा लाभलेल्या माटुंग्याच्या मरूबाईचा नवरात्रोत्सव

मुंबई- माटुंग्यातील सुमारे चारशे वर्षाची परंपरा लाभलेल्या मरूबाई देवीचा नवरात्रोत्सव यंदाही मोठ्या उत्साहात सुरू झालेला आहे. पारंपरिक पद्धतीने तुझ्या आईच्या सोबतच सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जात आहेत.
त्यानिमित्ताने आज गुरुवार ३ ऑक्टोबर ते शनिवार १२ ऑक्टोबरपर्यंत या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहे.अशी माहिती या मंदिराचे विश्वस्त अनिल गावंड यांनी दिली.
नवरात्री उत्सवात पुढील १० दिवसांत श्रीदेवीचा अभिषेक,भजन,दुर्गाष्टमी भजन, कुमारी पूजा अष्टमी होम-हवन,सामूहिक प्रार्थना,विजयादशमी आणि शमी पूजन आदी कार्यक्रम पार पडणार आहेत.हे कार्यक्रम शेजारील शंकरमठाच्या ट्रस्टीच्या सहकार्याने होत असतात. या चारशे वर्षे जुन्या असलेल्या या मंदिरातील मरूबाई देवी ही देवी दुर्गा,
लक्ष्मी आणि सरस्वती यांचे एकत्रित रूप असल्याची आख्यायिका आहे.
या मंदिरात मराठी,गुजराती, बंगाली

मल्याळी आणि दक्षिणात्य असे सर्व भाषिक भक्त पूजा अर्चा करण्यासाठी नियमितपणाने येत असतात.आपल्या लेकराचे मरणापासून रक्षण करणारी आई अशी ख्याती या देवीला मिळाल्याने तिचे नाव मरूआई किंवा मरूबाई असे पडले आहे. हे मंदिर पूर्वी टेकडीवर होते.त्यामुळे या भागाला मरूबाई टेकडी गाव असे म्हटले जायचे. त्याचाच अपभ्रंश होऊन या गावाचे नाव माटुंगा झाले आहे.याच ठिकाणच्या या मंदिरात नवरात्र काळात भाविकांची मोठी गर्दी होत असते.या मंदिराच्या विश्वस्त मंडळातर्फे वर्षभर अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात.भक्तांकडून मिळणाऱ्या देणग्यांमधून रूग्णांना मदत,अन्नदान आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्याला मदत केली जाते. मुंबई नगरीतील सर्वात जुना नवरात्र उत्सव अशी ख्याती असल्यामुळे मुंबईतील अनेक भाविक या ठिकाणी भेट देत असतात.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments