प्रतिनिधी : कराड येथील बालाजी रुग्णालयात कु वेदांत पवार या बारा वर्षे मुलाचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, यावेळी हॉस्पिटलच्या सर्व कर्मचाऱ्यांनी वेदांत पवार यास केक कापून शुभेच्छा दिल्या ,या हॉस्पिटलमध्ये प्रथमच अशाप्रकारे लहान मुलांचा (रुग्णांचा) वाढदिवस साजरा केल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना देखील याचा फार मोठा आनंद झाला.एकप्रकारे हे रुग्णालय आपल्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या व्यक्तींना घरातील कुटूंबाप्रमाणे वागवत आहेत.एक सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम या बालाजी रुग्णालयात होत असल्याचे चित्र बघायला मिळाले.
