मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या प्रतिष्ठित अशा सिनेट निवडणुकीचा आज निकाल लागण्यास सुरवात झाली आहे. या निवडणुकीसाठी मंगळवारी (२४ सप्टेंबर) रोजी मतदान पार पडले होते. या वेळी उद्धव ठाकरे यांची युवा सेना आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्यात थेट लढत पाहायला मिळाली. आत्तापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार राखीव गटातील 5 जागांवर ठाकरे गटाच्या उमेदवारांचा विजय झाला आहे.
युवासेनेच्या विजयी उमेदवारांची यादी

1) शशिकांत झोरे
2) शीतल देवरूखकर
3) धनराज कोहचाडे
4) मयूर पांचाळ
5) स्नेहा गवळी
खुला प्रवर्गातील युवासेना विजयी उमेदवारांची यादी
1) प्रदीप सावंत
2) मिलिंद साटम
निवडणुकीसाठी एकूण 28 उमेदवार उभे राहिले होते. यासाठी मुंबई विद्यापीठाच्या परिसरात 38 मतदान केंद्र आणि 64 बुथ तयार करण्यात आले होते. मतदानाचे नियोजन करण्यासाठी आवश्यक कर्मचारी आणि निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली होती.
सर्वोच्च न्यायालयातील याचिका मागे
महाराष्ट्र स्टुडंट युनियनने सिनेट निवडणूक स्थगित करावी अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. परंतु नंतर ती मागे घेण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला. या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.