प्रतिनिधी : केंद्रातील मोदी सरकारने गर्भवती महिलांसाठी प्रधानमंत्री मातृवंदना योजना सुरु केली आहे. या योजनेतंर्गत सरकार गर्भवती महिलांना 5000 हजार रुपये देते. योजनेतंर्गत गर्भवती महिलांना सरकार कडून आर्थिक मदत दिली जाते. मुलं कुपोषित राहू नयेत, कुठलाही आजार होऊ नये, यासाठी महिलांना मातृ वंदना योजनेतंर्गत पैसे दिले जातात.

या योजनेचे वैशिष्टय काय.
- गर्भवती महिलांच वय कमीत कमी 19 वर्ष असलं पाहिजे.
- या योजनेसाठी साठी तुम्हाला ऑफलाइन अर्ज करावा लागेल.
- 5000 रुपयाची रक्कम सरकार 3 हफ्त्यांमध्ये ट्रान्सफर करेल.
- या योजनेची सुरुवात 1 जानेवारी 2017 रोजी झाली होती.
पैसे कसे मिळणार.
लाभार्थी महिलांना 3 टप्प्यांमध्ये पैसे मिळतील. पहिल्या टप्प्यात 1 हजार रुपये, दुसऱ्या टप्प्यात 2 हजार रुपये आणि तिसऱ्या टप्प्यात 2 हजार रुपये मिळतील. गर्भवती महिलांच्या बँक अकाऊंटमध्ये हे पैसे थेट ट्रान्सफर होतील.
चेक करा सविस्तर माहिती.
तुम्ही खालील अधिकृत संकेतस्थळावर https://wcd.nic.in/schemes/pradhan-mantri-matru-vandana-yojana सुद्धा संपर्क करु शकता. इथे तुम्हाला या योजनेबद्दल सर्व माहिती मिळेल.