सातारा(अजित जगताप) : संच मान्यता शासन निर्णय व कंत्राटी शिक्षक भरती रद्द करणे व इतर प्रलंबित मागण्यांची सोडवणुकीसाठी आज बुधवार दिनांक २५ सप्टेंबर रोजी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व संघटनेच्या प्राथमिक शिक्षकांनी सातारा जिल्हा समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली विराट असा मोर्चा काढला. या मोर्चाने सर्व समाजाचे लक्ष वेधून घेतले. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळा व शिक्षण -विद्यार्थी आणि शिक्षकांच्या प्रगती आणि गुणवत्तेबाबत राज्य सरकार दुर्लक्ष करत आहेत.
शिक्षण हक्क कायदा २००९ मधील तरतुदीस विसंगत १५ मार्च २०२४ व ५ सप्टेंबर नंतर सुधारित २३ सप्टेंबर २०२४ रोजी शासनाने निर्णय घेतल्यामुळे प्राथमिक शाळेचे अस्तित्व संपणार आहे. या धोरणामुळे समाज व्यवस्था नष्ट होणार असून शिक्षण वाचवा, शिक्षक वाचवा, शाळा वाचवा या धोरणाप्रमाणे या आंदोलनामध्ये सर्व सहभागी झाली होते.
महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची पुणे येथे १४ सप्टेंबर रोजी बैठक झाली. त्यानंतर या मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षक- शिक्षिका उपस्थित राहून हा मोर्चा यशस्वी केला .वीस किंवा वीस पेक्षा कमी पट संख्या असलेल्या शाळेच्या बाबतीत शिक्षकांचे एक पद बंद करण्याचा आणि कंत्राटी पद्धतीचे सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांना नियुक्ती देण्याचा शासन निर्णय रद्द व्हावा. विद्यार्थी आधार कार्ड शिक्षक पद निर्धारण धोरण रद्द करावे. शैक्षणिक व अशैक्षणिक कामाचा बोजा कमी करावा. विद्यार्थ्यांना मोफत गणवेश अविलंब मिळावेत. मुख्यालयाच्या निवासाची सक्ती रद्द करणे. शिक्षण सेवक योजना बंद करून पूर्ण वेतनावर शिक्षक नियुक्ती करणे. आश्वासित प्रगती योजना लागू करणे व महत्त्वाचे म्हणजे जुनी पेन्शन योजना लागू करणे. अशा अनेक मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले.
या मोर्चाचे नेतृत्व सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ शिक्षक समिती, जुनी पेन्शन हक्क संघटना, शिक्षक परिषद, शिक्षक सेवा मंच अशा विविध संघटनेचा सहभाग होता .या वेळेला शिक्षक नेते विश्वंभर रणनवरे, चंद्रकांत यादव, मच्छिंद्र ढमाळ, सिद्धेश्वर पुस्तके, बळवंत पाटील, काका जेधे, किरण यादव, नितेश गायकवाड, महेंद्र जानुगडे, विष्णू खताळ, सतीश जाधव सौ भारती मदने , सौ जोशना माने,राजेंद्र शिंगाडे, संजय खरात, शशिकांत बागल, ज्योतीराम जाधव, महादेव राक्षे, अजित निकम, सुनीता देवकर, स्वाती चव्हाण व इतर शिक्षक शिक्षिका मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .
साताऱ्यात सर्व प्राथमिक शिक्षक संघटनेच्या विराट मोर्चाने घोषणाबाजीने परिसर दणाणला…
RELATED ARTICLES