Saturday, August 2, 2025
घरमहाराष्ट्रचेंबूर येथे अनंतचतुर्थी निमित्त विसर्जनावेळी संत रोहिदास परिवार संघातर्फे गणेश भक्तांना छोले...

चेंबूर येथे अनंतचतुर्थी निमित्त विसर्जनावेळी संत रोहिदास परिवार संघातर्फे गणेश भक्तांना छोले पाव वाटप

प्रतिनिधी – संत रोहिदास परिवार संघ,चेंबूर यांच्यावतीने सालाबादप्रमाणे यावर्षी सुद्धा अनंतचतुर्थी निमित्त विसर्जनावेळी हजारो गणेश भक्तांना छोले पाव वाटप करण्यात आले.संघाचे यंदाचे १७ वे वर्ष होते,जवळजवळ बारा ते पंधरा हजार गणेश भक्त या छोले पाव वाटपाचा आनंद घेत असतात. प्रथम वर्षी पाचशे छोले पावापासून सुरुवात केली होती.आज कमीतकमी बारा ते पंधरा हजार छोले पाव संपत असतात.दुपारी दोन वाजता सुरू केल्यानंतर रात्रौ ९ वाजेपर्यंत हा अन्नदानाचा कार्यक्रम राबविला जातो.त्यानंतर ज्या उमरशी बाप्पा चौक,चेंबूर येथे हा सामाजिक उपक्रम होतो.तो परिसर स्वच्छ करूनच सदर संघातील पदाधिकारी, कार्यकर्ते,विशेष करून महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित असतो,त्यामुळे अगदी व्यवस्थित नियोजनबद्ध पद्धतीत हा छोले पाव वाटप अन्नदानाचा कार्यक्रम पार पडतो, मंडळाचे मार्गदर्शक माजी नगरसेवक श्रीकांत शेट्ये,अध्यक्ष यशवंत तांदळे,लालासाहेब सोनवणे, पांडुरंग चिकणे,पत्रकार भिमराव धुळप,संतोष शिंदे,सुधाकर पाखरे, नारायण खरात,बापूसाहेब गणगे,लक्ष्मण पवार,नवनाथ सातपुते, चंद्रकांत विनेरकर, गणेश आरके, सुरेश कारंडे,गीताताई पाखरे,पुष्पाताई सोनवणे, दर्शनाताई कोंडविलकर यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments