
प्रतिनिधी : घरगुती आणि सार्वजनिक श्री गणेशोत्सवामध्ये विविध प्रकारची वैशिष्ट्ये आपल्याला पहायला मिळतात. ठाण्यातील ज्येष्ठ साहित्यिक, कवयित्री श्रीमती शुभांगी जयंत लेले यांच्या निवासस्थानी सुपूत्र आनंद, स्नुषा स्नेहा आणि नात मधुरा ही मंडळी दरवर्षी टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ सजावट करण्यासाठी अविश्रांत परिश्रम घेतात. जुन्या वर्तमानपत्रांचा लगदा बनवून त्यापासून विविध प्रकारची सजावट करतात. पेन्सिली, सोडावॉटर बाटल्या, छोट्या छोट्या प्लॅस्टिकच्या पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, जुन्या वह्या, पुस्तके, किराणा मालाच्या दुकानातून आणलेल्या वस्तूंच्या खोक्यांचा वापर सजावटीसाठी करुन आनंद जयंत लेले यांनी पारितोषिके पटकावली आहेत. ग्रंथ आणि साहित्य यांचा उपयोग करुन साहित्य प्रेमी गणरायही भक्तांच्या दर्शनाला आले आहेत. यंदा कोरोगेटेड बॉक्सच्या पुठ्ठ्यातून मंदिर साकारुन त्याला छानशी रंगसंगती करुन भाविक भक्तांच्या डोळ्याचे पारणे फेडले आहे.