प्रतिनिधी : महात्मा फुले शिक्षण संस्था संचालित , छत्रपती शिवाजी विद्यालय धारावी मुंबई प्रागंणात ५ सप्टेंबर २०२४, रोजी सकाळी १२ ते १ या वेळेत शिक्षक दिन सोहळा आयोजित करण्यात आला होता. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन हा शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून’कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. महात्मा फुले शिक्षण संस्थेचे खजिनदार श्री प्रमोद सर, यांनी शिक्षकांना उदबोधनात्मक मार्गदर्शन केले. सर्व माध्यमातील विद्यार्थ्यानी शिक्षकांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. महात्मा फुले शिक्षण संस्थे मार्फत सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी सर्वाना भेट वस्तू देऊन सर्वांचा सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रमात महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व माजी आमदार श्री बाबुराव माने सर , संस्थेचे सचिव दिलीप शिंदे सर , संस्थेचे खजिनदार श्री प्रमोद सर, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ विणा दोनवलकर मॅडम माध्यमिक इंग्रजी विभागाच्या मुख्याध्यापिका सौ.स्वाती होलमुखे मनोहर जोशी कॉलेज प्रिंसिपल कमलेश सोनपसारे सर, संस्थेचे अधिक्षक श्री.कणसे सर, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ श्रद्धा मॅडम तसेच शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी हे सर्वजण सहभागी झाले होते.
