सातारा (अजित जगताप) : समाज माध्यमावर काही व्यापारी व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्यामध्ये गैरसमज पसरवणारी क्लिप प्रसारित झाली. यामुळे काहींच्या भावना दुखावल्या असल्या तर सातारा शहरातील व्यापारी संघटनेने मनाचा मोठेपणा दाखवून त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली . आता साताऱ्यातील वादाचे विघ्न टळले असून श्री गणरायाच्या सार्वजनिक गणेशोत्सव आता जल्लोषात साजरा करण्याचा निर्णय साताऱ्यातील व्यापारी व काही गणेश उत्सव मंडळ भक्तांनी घेतलेला आहे.
आज साताऱ्यातील व्यापार संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी दुपारी गणरायाच्या आगमनाचे स्वागत करून गणेश मंडळांच्या मध्ये झालेल्या गैरसमज बाबत जाहीर खुलासा केला. त्याच्या लेखी प्रति पोलिस अधीक्षक ,सातारा जिल्हा व सातारा शहर पोलीस निरीक्षक यांना दिलेला आहे. गणेश भक्त व व्यापारी वर्गात बद्दल काही गैरसमज निर्माण झालेला आहे .तो गैरसमज काही समाज माध्यमाने जुने फोटो प्रसारित केल्यामुळे झालेले आहे. खरं तर तो फोटो हा सर्व व्यापारी वर्गाने बदलापूर येथे झालेल्या दुर्देवी घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी दिलेल्या निवेदनाचा होता. परंतु समाज माध्यमातून चुकून तो फोटो प्रसारित झालेले व्यापाऱ्यांचा विरोध आहे. असा आभास निर्माण करण्यात आला.
