प्रतिनिधी : कोयना सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघ लि. कराड यांच्या प्रांगणात लोकनेते स्वर्गीय विलासकाका पाटील (उंडाळकर) माजी सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण शुक्रवार ६ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी ३. ००वा. संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे पूज्य श्री काळसिद्धेश्वर स्वामीजी (४९ वे मठाधिपती श्री क्षेत्रसिद्धगिरी मठ कनेरी) कार्यक्रमाचे अध्यक्ष सातारा जिल्हा पालकमंत्री शंभूराजे देसाई, प्रमुख पाहुणे माजी मुख्यमंत्री व विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण, माजी राज्यपाल व माजी खासदार श्रीनिवास पाटील, सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस उदयसिंह पाटील (दादा) यांच्यासह या कार्यक्रमाचे आयोजक लक्ष्मण देसाई, शिवाजीराव जाधव, अमोल गायकवाड आहेत.सदर कार्यक्रम शुक्रवार दिनांक ६ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी ३.०० वाजता, स्थळ – कोयना सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघ लि. कराड खोडशी,ता. कराड येथे संपन्न होणार आहे. तरी या कार्यक्रमाला सर्व काका प्रेमींनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
