मुंबई (रमेश औताडे) : शिक्षण, सदभावना आणि राष्ट्रप्रेम विकसित करण्यासाठी मदर तेरेसा फाउंडेशन चे देशभर कार्य सुरू आहे. समाजाला व्यसनमुक्त करण्यासाठी आत्तापर्यंत फाउंडेशन ने ४२ ” नशा मुक्ती केंद्र ” सुरू केली आहेत व अजून त्यांची संख्या वाढत असून त्यामार्फत जनजागृती करण्यात येत आहे. अशी माहिती फाउंडेशन चे राष्ट्रीय संयोजक व माजी आमदार समाजवादी पार्टी चे राष्ट्रीय सचिव मोहम्मद अरशद खान मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
फाउंडेशनच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा उपासना वैश्य यांनी सांगितले की, महिला सक्षमीकरण कार्यशाळा व कुटुंब सल्ला केंद्र फाउंडेशन ने सुरू केले आहे. तर प्रदेश अध्यक्ष अल्ताफ सनाउल्लाह अंसारी म्हणाले, तरुण वर्गात उद्योग व्यवसाय वाढावा यासाठीही फाउंडेशन कार्य करत आहे.
राष्ट्रीय मानवाधिकार व न्याय प्राधिकरण चे अध्यक्ष अहमद कुरैशी हे न्याय दान विभागाच्या माध्यमातून कायदेविषयक मार्गदर्शन करत आहेत. यावेळी काशिराम विचार मंचचे प्रदेश अध्यक्ष रहमतुल्लाह खान, अब्दुल रहमान तारिक उपस्थित होते.