Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रमाजी सैनिकाचा अन्यायाविरोधात ३३ वर्षापासून लढा

माजी सैनिकाचा अन्यायाविरोधात ३३ वर्षापासून लढा

मुंबई (रमेश औताडे) : न्याय मागण्यासाठी एका माजी सैनिकाला सरकारी यंत्रणे विरोधात व लाल फितीच्या कारभारामुळे ३३ वर्ष आंदोलन करूनही न्याय मिळाला नाही. राष्ट्रपती, राज्यपाल, पंतप्रधान, मुख्यमंत्री आदी सर्व विभागाने याबाबत सामान्य प्रशासनाला पत्र देऊनही सामान्य प्रशासन विभाग न्याय देत नाही. त्यामुळे आझाद मैदानात आंदोलनास बसलेले माजी सैनिक अनंत लक्ष्मण निकम त्रासले असून अजून किती वर्ष मला आंदोलन करावे लागेल असा सवाल ते सरकारला करत आहेत.

राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्या कार्यालयात पत्रव्यवहार केलेली सर्व कागदपत्र मी जपून ठेवली आहेत. भारतीय सैनिकांचे दिल्ली येथील मुख्यालय त्यांच्या कार्यालयात केलेला पत्रव्यवहार माझ्याकडे आहे. सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी स्वतः लक्ष घालून मला सहकार्य केले असतानाही महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग दिरंगाई करत आहे. मात्र जीव आहे तोपर्यंत लढाई लढणार असा इशारा अनंत लक्ष्मण निकम यांनी दिला आहे.

मी एक खेळाडू आहे. त्यामुळे त्या प्रवर्गात नोकरी मिळाली मात्र अद्याप कॅप्टन पदाचे ओळखपत्र व पेन्शन आदेश मिळाले नाही. न्यायालयाने माझ्या बाजूने निकाल दिला आहे. तरीही सामान्य प्रशासन चाल ढकल करत आहे. त्यामुळे सरकारने जर मला न्याय दिला नाही तर हे आंदोलन तीव्र करणार असा इशारा त्यांनी दिला आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments