ताज्या बातम्या

सातारा रोड रेल्वे स्टेशन जवळ असलेला कोरेगाव पाडळी कडे जाणारा कॅनॉल वरील मोडकलीस आलेला ब्रिज दुरुस्ती करण्याची स्थानिक रहिवाश्यांनी मागणी

प्रतिनिधी :सातारा रोड (जुनेरेल्वेस्टेशन)कोरेगाव,पाडळी.येथून कॅनल वरती जाण्यासाठी जो पूल आहे पण तो खूप मोडकळीस आला असून, तेथील रहिवाशांना येण्यासाठी, जाण्यासाठी खूप त्रास होत आहे. सायकल, टू व्हीलर वरती घेऊन जाणे त्रास दायक होत आहे. कॅनलला संरक्षण कठडा हि व्यवस्थित नाही त्यामुळे लहान मुले,स्त्रियांना बाहेर रात्री जातांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.चालताना जाणवते हा कधी पडेल.खाली बारा ते दहा फूट खोल कॅनल भरलेला वाहतो किंवा सुका/कोरडा असतो. येथे फक्त मतदान आले कि नेते येतात, नारळ फोडून जातात” पण हा ब्रिज(वाहतूक पूल) नवीन बनत नाही. खूप अपघात झालेत या ठिकाणी. डुकरं आणि कचरा सर्वं ठिकाणी दिसून येतो.साताऱ्यातील जुने रेल्वे स्टेशन (जुन्या आठवणी दगडी बांधकाम आहे) यांचे पुरावे दिसता. “जरंडेश्वर मंदिर”आणि “कल्याण गड” जवळ आहे. त्यामुळे हा  पूर्वी बांधण्यात आलेला ब्रिज (पूल) ये-जा करण्यासाठी त्वरित स्थानिक नेते,प्रतिनिधी यांनी लक्ष घालून तो बनवावा.अशी मागणी स्थानिक रहिवाश्यानी केली आहे. रविवारी सकाळी स्थानिक रहिवाशी संबंधित विभागाचे आमदार महेंद्र शिंदे यांना लेखी निवेदन देऊन संबंधित पूल त्वरित बनवून द्यावा अशी मागणी देखील करणार आहेत. स्थानिक प्रशासनाने देखील या प्रकरणी दखल घ्यावी नाहीतर कोणाचा जीव गेला किंवा जीवितहानी झाली तर आपले डोळे उघडणार का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

आपल्या या माध्यमातून नेते,प्रतिनिधी,सातारा प्रेमी, यांनी एकदा येऊन पहा आणि झालंच तर हा पूल (ब्रिज) मोठा आणि मजबूत बनेल का,यावर विचार करा.
खर्च जास्त नाही,पण तिथं येऊन माणुसकीच्या नजरेनं पाहणं हे महत्त्वाचे आहे.
अपघातानंतर श्रद्धांजली,आर्थिक मदत देण्यापेक्षा परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी सहकार्य करा.
उद्या सकाळी सर्व रहिवाशी पहाटे आमदार श्री. महेश शिंदे यांना भेटून आमच्या समस्या सोडवा असे निवेदन देणार आहेत.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top