प्रतिनिधी : मी मुंबईत शिवसैनिकांसमोर बोललो की, एकतर तू राहशील किंवा मी राहिल. इकडे माझ्या पायाशी एक कलिंगड ठेवलं आहे. काही जणांना वाटलं मी त्यांना (देवेंद्र फडणवीस) आव्हान दिलं. मी कोणत्याही ढेकणाला आव्हान देत नाही. मी म्हणजे कोण आणि तू म्हणजे कोण? हे समजून घेतलं पाहिजे. मी म्हणजे माझा संस्कारिक महाराष्ट्र आणि तू म्हणजे महाराष्ट्रात दरोडा टाकणाऱ्यांचा आख्खा पक्ष. ढेकणाला आव्हान देत नाही. ढेकणं अंगठ्याने चिरडायची असतात. तुझ्या नादाला लागण्याएव्हढ्या कुवतीचा तू नाही आहेस, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्षरित्या घणाघाती टीका केली. ते शिवसेना ठाकरे गटाच्या ‘चला जिंकूया’ शिवसंकल्प मेळाव्यात बोलत होते.

उद्धव ठाकरे म्हणाले, चला जिंकूया हे बोलायला खूप सोपं आहे. पण कसं जिंकायचं आणि कशासाठी जिंकायचं, हा महत्त्वाचा विचार आहे. जिंकायचं कसं? हे तुम्हाला सांगितलं आहे आणि कशासाठी जिंकायचं आहे, याचा अनुभव तुम्हाला सर्वांना येत आहे.गेल्या काही दिवसांपूर्वी पूण्यात पूर आला होता. हा केवळ एका विभागाचा पूर नाही. काही हजारो संसार त्यात उद्ध्वस्त झाले. पाऊस पडला, पूर आला. पाणशेतचंही धरण फुटलं होतं. देशात वायनाड, केदारनाथ अशा बऱ्याच ठिकाणी पूर येत आहे. भूस्खलन होत आहे. आपल्याकडून गुन्हे घडत आहेत.या गुन्हेगारांना लटकवण्यासाठी आपल्याला जिंकलं पाहिजे. फासावर नसलं तरी उलटं लटकवलं पाहिजे. मी पुणेकरांना विनंती करेल, हा आख्खा विषय पुणेकरांचा आहे. इकडे जॉगिंग, सायकल ट्रॅक होईल, हे विकासाचं स्वप्न दाखवणं खूप चांगलं आहे. पण त्यासाठी शहराची काय हानी होणार आहे, ते सुद्धा दाखवा. मुंबईत पूर आल्यावर काही ठिकाणी आम्ही उपाययोजना केली.
तरीही यावर्षी वेगळ्या ठिकाणी पाणी तुंबलं. कारण मुंबईत नियोजन शुन्य मेट्रोची कामं सुरु आहेत. अनेक ठिकाणी मुंबईत पिण्याच्या पाण्यात गटाराचं पाणी मिसळत आहेत. पोटाचे विकार होत आहेत. काही वर्षांपूर्वी व्येंकया नायडू आले होते. त्यावेळी त्यांनी विचारलं होतं की, नदीचं नाव काय? त्यांना कुणीतरी सांगितलं ही मुळामूठा नदी आहे. ते म्हणाले ही काय नावं आहेत.
आता व्यंकय्यांचं नाव ठेवायचं की मोदी नदी असं नाव ठेवायचं? सर्व ठिकाणी मोदी मोदी सुर आहे. पण त्यांनी सांगितलं यांची नावं बदला. नावतर ते बदलू शकत नाहीत. एका ठिकाणी भराव टाकून नदीचा प्रवाहच बंद करून टाकला. मग नदी इकडे तिकडे घुसणारच. मला पुणं वाचवायचं आहे, म्हणून मला जिंकायचं आहे. मला पुण्याचा शाश्वत विकास करून दाखवायचं आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.