Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रमुख्यमंत्री निधीतून १ लाख ७० हजार रुपयांचा धनादेश शिवसेना नेत्या डॉ. नीलम...

मुख्यमंत्री निधीतून १ लाख ७० हजार रुपयांचा धनादेश शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून पत्रकार श्री.पंढरीनाथ सावंत यांना केला सुपूर्द

प्रतिनिधी : ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत हे हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अतिशय निकटचे सहकारी राहिलेले आहेत, तसेच शिवसेनेचा आवाज बुलंद करणाऱ्या – मार्मिक च्या जडणघडणीमध्ये त्यांचे मोलाचे योगदान आहे.

मात्र, प्रकृतीस्वास्थ्याच्या कारणास्तव त्यांना बसविण्यात आलेल्या पेस मेकरची बॅटरी बदलायची आहे. त्याकरिता मोठा खर्च अपेक्षित आहे, असे लक्षात आले. त्यांचे कार्य आणि शिवसेनेसाठी दिलेले योगदान लक्षात घेऊन त्यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉ.गोऱ्हे यांच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत ही वैद्यकिय मदत पोहोच केली.

पंढरीनाथ सावंत यांच्या वैद्यकीय सुविधेसाठी मुख्यमंत्री निधीतून विशेष सहाय्य म्हणून १ लाख ७० हजार रुपयांचा धनादेश त्यांना उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते सुपूर्द केला.

यावेळी पंढरीनाथ सावंत यांना माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि सरकार त्यांच्या सोबत आहे, अशी ग्वाही दिली.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments