Sunday, September 21, 2025
घरमहाराष्ट्रसातारायेवती,कराड येथील सकाळच्या ७ च्या एसटीला लागला ब्रेक; विद्यार्थी वर्गातून तीव्र नाराजी

येवती,कराड येथील सकाळच्या ७ च्या एसटीला लागला ब्रेक; विद्यार्थी वर्गातून तीव्र नाराजी

कराड (प्रतिनिधी) येवती ता. कराड येथील कराड ते येवती सकाळी ७ वा.ची एसटी बस मोठा गाजावाजा करत कराड डेपो ने सुरु केली ,मात्र अवघ्या आठच दिवसात या एसटीला ब्रेक लागला त्यामुळे येरे माझ्या मागल्या या म्हणी प्रमाणे पुन्हा एकदा कराड डेपो चा कारभार चव्हाट्यावर आला आहे, यामुळे विद्यार्थी वर्गातून प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे, येवती येथे सकाळी सात वाजता येणारी एसटी बस बंद झाल्याने या परिसरातील घराळवाडी , हनुमंतवाडी ,काटेकर वाडी, येवती, महासोली, सवादे ,या गावातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानी बरोबरच आर्थिक नुकसान देखील होत आहे, कारण हे सर्व विद्यार्थी कराड , उंडाळे ओंड , नांदगाव ,घोगाव या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी जात असतात येथे जाण्यासाठी विद्यार्थ्यांनी विद्यार्थी पास देखील काढले आहेत, मात्र एसटीच बंद झाल्याने विद्यार्थ्यांना वेळेत पोचण्यासाठी त्यांना वडाप चा आधार घ्यावा लागत आहे , त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसानी बरोबरच आर्थिक नुकसान देखील होत आहे ,या परिसरातील सर्व मुले ही शेतकरी वर्गातील असल्याने वडाप साठी रोज रोज पैसे कुठून आणायचे असा प्रश्न त्यांच्यापुढे आ वासून उभा राहिला आहे, याकडे गांभीर्याने घेऊन कराडआगार प्रमुखांनी वेळीच लक्ष घालून सकाळी सात वाजताची एसटी पुन्हा एकदा लवकरच सुरू करावी अशी मागणी विद्यार्थी व पालक वर्गातून केली जात आहे .

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments