तळमावले/वार्ताहर(डॉ संदीप डाकवे) : हरीत क्रांतीचे प्रणेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन साजरा करण्यात येतो. या कृषी दिनाचे औचित्य साधत डाकवे परिवाराकडून शेतीमित्र डाॅ.संदीप डाकवे यांचा सन्मान करण्यात आला. काही दिवसापूर्वीच त्यांना महाराष्ट्र राज्य शासनाच्या कृषी विभागाचा पत्रकारितेचा सर्वोच्च वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार आणि कृषी दिनाचे औचित्य साधत डाकवे परिवाराने केलेल्या अनोख्या आणि अनपेक्षित सन्मानाने डाॅ.डाकवे भारावून गेले. या कौटुंबिक सोहळयाप्रसंगी गयाबाई डाकवे, रेश्मा डाकवे, गौरी डाकवे, पौर्णिमा डाकवे, प्रथमेश डाकवे, लक्ष्मी डाकवे, अनुसया डाकवे, स्पंदन डाकवे, सांची डाकवे व कुटूंबातील इतर सदस्य उपस्थित होते. प्रारंभी कुटूंबातील सदस्यांनी डाॅ.संदीप डाकवे यांचे औक्षण करत स्वागत केले.
डाॅ.संदीप डाकवे यांनी शेतीविषयक वृत्तपत्रातून उत्कृष्ट वार्तांकन, यशोगाथा, कृषीसंदेश यांचे लिखाण केले आहे. तसेच कृषिविषयक लेखमाला, पुस्तक प्रकाशन, निवडक लेखांचे प्रदर्शन, व्यंगचित्रे, हस्तलिखिते आदि नावीण्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत. त्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मस्त्यव्यवसाय यांच्यावतीने कृषी क्षेत्रातील लिखाणाबद्दल सन 2022 चा वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार डाॅ.डाकवे यांना जाहीर केला आहे.
यापूर्वी पत्रकारितेसाठी डाॅ.डाकवे यांना महाराष्ट्र शासनाचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलमित्र पुरस्कार, महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिम उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार, राजमाता जिजाऊ स्वावलंबन सवोत्कृष्ट पत्रकार पुरस्कार, जि.प.कृषी विभाग सातारा यांचा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार, ग्रामीण विकास यंत्रणेचा राजमाता जिजाऊ स्वावलंबन असे विविध पुरस्कार मिळाले आहेत. शेतीमित्र पुरस्कार पटकावत डाॅ.संदीप डाकवे यांनी राज्य शासनाचे पुरस्कार मिळवण्याचा षटकार ठोकला आहे. डाॅ.डाकवे यांना वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.
कृषी दिनानिमित्त शेतीमित्र डाॅ.संदीप डाकवे यांचा परिवाराकडून सन्मान
RELATED ARTICLES