Saturday, August 23, 2025
घरमहाराष्ट्रप्रतिष्ठित लोकहितवादी रावबहाद्दूर सि. के. बोले पुरस्कार २०२४ पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

प्रतिष्ठित लोकहितवादी रावबहाद्दूर सि. के. बोले पुरस्कार २०२४ पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

प्रतिनिधी : थोर समाजसुधारक, महात्मा ज्योतीबा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विश्वासू सहकारी, देवदासी प्रथा बंद करण्यासाठी, सार्वजनिक ठिकाण, पाणवठे सर्वांसाठी खुले करण्याबाबत अनेक समाज सुधारनेचे कायदे बनविणारे तसेच कोकण रेल्वेसाठी प्रस्ताव मांडणारे सत्यशोधक समाजाचे मानबिंदू, आद्य कामगार नेते लोकहितवादी रावबहाद्दूर सि. के. बोले यांची २९ जून रोजी १५६ वी जयंती तसेच राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्ताने कला,सामाजिक कार्य, विज्ञान, उद्योग, वैद्यक, साहित्य, शिक्षण, पर्यावरण, क्रीडा, नागरिक सेवा, पत्रकारीता इत्यादी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आले.

समाजभुषण पुरस्कार :-
१) मा. श्री. जय साटेलकर (वैद्यक )
२) मा. श्री. सुनिल रामराव शेळके (चित्रपट )
३] मा. श्री. अमोल मडामे (व्यसन मुक्ती )
४) मा. श्री. प्रभाकर वाईरकर (व्यंगचित्रकारीता )
५) मा. श्री. मिलिंद आरोलकर (पत्रकारीता )
६) मा. श्री. प्रेमरत्न चौकेकर (पत्राकारीता

समाजरत्न पुरस्कार:-
१) मा. श्री. सत्यवान रेडकर (शैक्षणिक क्षेत्र)

कोकणरत्न पुरस्कार
१) मा. श्री. सत्यजित चव्हाण (पर्यावरण )

कलाभुषण पुरस्कार
१) मा. श्री. अजय फणसेकर (कला क्षेत्र )

सहकार व उद्योगरत्न
१) मा. श्री. चंद्रकांत बी. जगताप -सहकार भुषण २०२४
२) मा. श्री. अनिल काशीराम मिठबावकर – उद्योगरत्न २०२४

१) मा. श्री. भरत निचिते – ओबीसी योद्धा पुरस्कार
२) मा. श्री. समिर वर्तक – पर्यावरण रक्षक पुरस्कार
३) मा. श्री. मोहम्मद अयुब हनीफ कुरेशी – ओबीसीरत्न
४) मा. श्रीमती. अलका नाईक – साहित्यरत्न पुरस्कार २०२४
५) मा. श्री. निसार अली सफरदर सय्यद – झुंझार पत्रकार
६) मा. श्री. शंकर लोके – जीवनगौरव पुरस्कार २०२४
सर्वसमाज ओबीसी महाआघाडी
लोकहीतवादी रावबहाद्दूर सि. के. बोले स्मारक समिती
भंडारी मंडळ, दादर यांच्या संयुक्त विद्यमानाने जयंती उत्सव २०२४ साजरा करण्यात आला असून सदर कार्यक्रमाचे आयोजन कांचन नाईक, गंगाराम पेडणेकर, नंदकुमार कांबळी, शंकर लोखंडे,राम वाडीभस्मे,नरेश मोरे, जयभीम कांबळे यांनी केले असून प्रमुख पाहुणे म्हणून सिनेअभिनेता अजय फणसेकर, गुरुनाथ मिठबावकर, शंकर हळदणकर, किरण मांजरेकर, आकीफ दफेदार, शांताराम आंग्रे, अमित पेडणेकर उपस्थित होते.
सि. के. बोले यांच्या कार्यावर चित्रलेखा मासिकाचे संपादक ज्ञानेश महाराव व प्रा. विजय मोहिते यांनी प्रकाश टाकला.
कार्यक्रमाच्या शेवटी ओबीसी नेते संतोष आंबेकर यांनी ओबीसी समाजाला बुद्धीवादाकडे वळण्याचा संदेश देत कार्यक्रमाचा समारोप केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजस्विनी मुंडये आणि युरेका वाईनकर यांनी केले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments