ताज्या बातम्या
तमाशा च्या फडातुन सांस्कृतिक प्रवास सुरु केलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री अन् लावणीसम्राज्ञी मधु कांबीकर यांचं आकस्मिक निधन; मराठी सिनेसृष्टीवर शोककळालोककलेच्या नभांगणातील ‘मधुरंग’; लावणीसम्राज्ञी मधु कांबीकर…! पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी राजशिष्टाचार बाजूला ठेवून मधुबाईंसोबत धरलेला फुगडीचा फेर!क्राफ्ट पेपरच्या दरात तीन महिन्यांत २५ टक्क्यांपर्यंत वाढ; कोरुगेटेड बॉक्स उद्योग संकटात बॉक्स उत्पादकांची दरवाढ लागू करण्याची आणि पेपर मिल्सकडे दर स्थिर ठेवण्याची मागणीपर्यावरण संवर्धनासाठी ‘वसुंधरा पायी दिंडी’; १४ ते १७ ऑक्टोबरदरम्यान कराड तालुक्यातून मार्गक्रमणपुणे जिल्ह्याचे नाव ‘छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा’ करावे : डॉ. अविनाश सकुंडे

वारुंजी फाटा, कराड : राष्ट्रीय महामार्गालगत कचऱ्याचे साम्राज्य; संबंधित विभाग झोपेत?

कराड(प्रताप भणगे) :

कराड तालुक्यातील वारुंजी फाटा येथील राष्ट्रीय महामार्गालगत मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साचल्याने परिसराची दयनीय अवस्था झाली आहे. स्वच्छ भारत अभियानाचे फलक एकीकडे आणि प्रत्यक्षात महामार्गाच्या कडेला प्लास्टिक, घरगुती कचरा, बांधकामाचा मलबा व इतर टाकाऊ वस्तूंचे साम्राज्य दिसत असल्याने संबंधित विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरत असून पावसाळ्यात डासांची वाढ होण्याचा धोका निर्माण झाला आहे. दररोज हजारो वाहनधारक या मार्गावरून प्रवास करतात. मात्र, महामार्गाच्या कडेला पडलेल्या कचऱ्यामुळे परिसराचे विद्रूपीकरण होत असून पर्यावरणालाही मोठा धोका निर्माण झाला आहे.
स्थानिक नागरिकांनी अनेकदा तक्रारी करूनही अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप केला आहे. संबंधित विभागाने तातडीने कचरा हटवून नियमित स्वच्छता करावी, तसेच रस्त्यालगत कचरा टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

Scroll to Top