सातारा(अजित जगताप) : वाई तालुक्यातील धोम व सातारा- जावळी तालुक्यातील कण्हेर धरणामुळे विस्थापित झालेल्या धरणग्रस्तांचे पुनर्वसन सातारा तालुक्यात झाले आहे. अनेक जण कराड कोरेगाव सातारा तालुक्यातील पुनर्वसित गावामध्ये स्थायिक झाले आहेत. अशावेळी धोम व कण्हेर प्रकल्पामुळे मूळ गावे व राहती घरे सोडून इतरांच्या हितासाठी संसारावर अक्षरशः नांगर फिरवून स्थलांतर स्वीकारले आहे . त्याच जागी लोकोपाठ बद्दल उपविभाग असावा अशी मागणी धरणग्रस्त संघटनेने केली आहे. धरणग्रस्तांच्या
त्यागानंतरही अनेक वर्षे उलटून गेली असली तरी पुनर्वसित गावठाणांतील अनेक मूलभूत प्रश्न आजही प्रलंबित
आहेत. या प्रलंबित प्रश्नांचा पाठपुरावा करण्यासाठी सातारा हे मध्यवर्ती व सर्वांच्या दृष्टीने सोयीचे ठिकाण आहे. महत्वाची शासकीय कार्यालय ही साताऱ्यात आहे.
त्यामुळे पुनर्वसित गावांतील नागरिकांना सातारा येथे ये-जा करणे तुलनेने सोयीचे पडते. परंतु, संबंधित कार्यालय
वाई येथील कार्यालयास जोडले गेल्यास सर्वच पुनर्वसित गावांतील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होणार आहे.
त्यामुळे आर्थिक, मानसिक व वेळेचा मोठा भार धरणग्रस्तांवर पडणार आहे . तसेच प्रलंबित प्रश्न निकाली काढण्यास अधिक
विलंब होण्याची शक्यता आहे. धोम व कण्हेर प्रकल्पांतर्गत पुनर्वसित गावांचे पुनर्वसन कराड, कोरेगाव, सातारा व
जावळी या तालुक्यांमध्ये झालेले आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्त नागरिकांना कामानिमित्त वारंवार वाई येथे जाणे वाहतूक व
अत्यंत गैरसोयीचे ठरणार आहे. तसेच जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांचे मुख्यालयही सातारा येथे असल्याने सर्व
संबंधित प्रशासकीय कामकाज साताऱ्यातूनच अधिक सुलभपणे पार पडते.
त्यामुळे सर्व बाबींचा विचार करून लघु पाटबंधारे उपविभाग हा वाई विभागास न जोडता सातारा मुख्यालय असणाऱ्या पूर्वीच्या विभागामध्येच कायम ठेवण्यात यावा, अशी मागणी केली आहे. यावेळी ला धरणग्रस्त संघटनेचे मंगलदास गायकवाड, गणेश सणस, संजय शेलार, रुपेश सपकाळ, सदाशिव चोरट आणि अनिल सणस यांच्या शिष्टमंडळाने लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अधीक्षक यांची भेट घेऊन निवेदन दिले.
धरणग्रस्तांच्या भावना, वेदना व अडचणी यांची सरकारला पूर्ण जाणीव आहे, याची खात्री आहे.
त्यामुळे धरणग्रस्तांच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक व सकारात्मक विचार करून प्रस्तावित निर्णय स्थगित करावा. लघु
पाटबंधारे उपविभाग पूर्ववत सातारा मुख्यालयाच्या अखत्यारीत ठेवण्यात यावा, अशी धरणग्रस्तांनी कळकळीची विनंती केली आहे.अन्यथा, धरणग्रस्तांच्या मागणीबाबत कोणताही सकारात्मक निर्णय न झाल्यास,
नाईलाजास्तव लोकशाही मार्गाने लाक्षणिक उपोषण व आंदोलन करण्याचा मार्ग स्वीकारावा लागेल. असेही स्पष्ट केले आहे. सदर निवेदनाच्या प्रती
माहितीस्तव अधिक्षक अभियंता, जलसंवर्धन व लघु पाटबंधारे विभाग,मुख्यमंत्री,
मदत व पुनर्वसन मंत्री ,
जिल्हाधिकारी, सातारा.
जिल्हा पुनर्वसन अधिकारी, सातारा.कार्यकारी अभियंता, धोम कालवे विभाग क्र. २ यांना पाठवण्यात आले आहेत. ……………………………….. फोटो- धोम व कण्हेर धरणग्रस्तांचे निवेदन देताना धरणग्रस्त (छाया- अजित जगताप ,सातारा)




