ताज्या बातम्या

केळघर घाट पूल तीन महिन्यात वाहतुकीसाठी खुला होणार…

केळघर(अजित जगताप) : जावळी -महाबळेश्वर तालुक्यातील जोडणाराकेळघर घाट ओढा पूल रेंगडी परिसर आंबेघर पूल बदल्याचे काम वेगाने होत आहे. पुढील तीन महिन्यात हा पूल वाहतुकीसाठी खुला होईल. अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
सातारा- केळघर महाबळेश्वर मार्गावरील आंबेघर ता. जावली येथे या पुलाचे बांधकाम पूर्ण झाले असून सध्या रस्त्यावरील डांबरीकरणाचे काम युद्ध पातळीवर होत आहे. वेण्णा नदीवर ‘आर्च’ पद्धतीने कोरीव दगड व चुन्याच्या मिश्रणातून बांधलेला सुमारे १५० वर्षांपेक्षा जुना पूल होता. हा ऐतिहासिक पूल जीर्ण झाल्यामुळे जानेवारी महिन्यात पाडण्यात आला होता. आता सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत नवीन पुलाचे व रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पावसाळ्याच्या तोंडावर तात्पुरत्या पर्यायी रस्त्याची देखभाल दुरुस्ती व्हावी अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांच्या वतीने अँड. दत्ता धनावडे, विनोद पार्टे व ग्रामस्थ व पर्यटकांनी केली आहे.
केळघर घाटास विटा ते महाबळेश्वर या संपूर्ण राज्यमार्गाच्या रुंदीकरण,
काँक्रिटीकरण, मोऱ्यांचे नूतनीकरण आणि आंबेघर येथील नवीन पुलाच्या बांधकामासाठी सुमारे ९० ते ९५ कोटी रुपये खर्च झालेले आहेत.आणखीन आवश्यक निधी
टप्प्याटप्प्याने मंजूर करण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नातून अखेर या पुलाला नूतनीकरणामुळे झळाळी मिळाली आहे.केळघर घाट मार्गावरील वाढती वाहतूक
लक्षात घेऊन नवीन पुलाची रुंदी चारपदरी
रस्त्याला सुसंगत अशी झाली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होणार नाही. आंबेघर पुलाची उंची वाढल्याने हा परिसर सेल्फी पॉइंट होण्याची शक्यता आतापासूनच वर्तवण्यात येत आहे. कामाचा दर्जा टिकवण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा वापरण्यात आली आहे.
. त्यामुळे हा खऱ्या अर्थाने विकास मार्ग ठरला आहे. त्या पुलाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासह मान्यवर उपस्थित राहतील. यासाठी नियोजन करण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे.
—————————————————

फोटो- केळघर घाटातील आंबेघर येथील पुलाचे युद्धपातळीवर सुरू असलेले काम (छाया- अजित जगताप , केळघर )

Scroll to Top