ताज्या बातम्या

स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी नारीशक्तीला प्राधान्य देण्याची सांगली साताऱ्यातून मागणी….

सातारा(अजित जगताप) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिक्षण माता सावित्रीबाई फुले यांच्या सातारा जिल्ह्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे वारे वाहत आहे. नारीशक्तीला प्राधान्य देण्याची मागणी सांगली व सातारा जिल्ह्यातून नारीशक्तीकडून होऊ लागली आहे. त्यामुळे महायुती व महाविकास आघाडी यांच्या विचार व कृती याबाबत आता गोंधळ निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
नवी दिल्ली येथील संसद भवन मध्ये महिलांच्या आरक्षणाबाबत विधेयक मांडण्यात आले होते. भाजप व त्यांच्या मित्रपक्षाने यासाठी खास अधिवेशन बोलवण्यात आले होते. या अधिवेशनामध्ये विरोधकांनी भाजपच्या राजकीय खेळीला चांगलीच खीळ बसवली होती. हे विधेयक बहुमताने नामंजूर करण्यात आले. तेव्हापासून महिलांच्या म्हणजेच नारीशक्तीला अडथळा करणाऱ्या विरोधकांना महिला धडा शिकवतील. असे वक्तव्य त्यावेळी भाजपचे नेते व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. सातारा जिल्ह्यातही भाजप पक्षाच्या पदाधिकारी महिलांनी याबाबत काँग्रेस पक्षाचा निषेध केला. काँग्रेसनेही त्याला सडेतोड उत्तर दिले.
आता सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने नारीशक्तीला उमेदवारी देऊन””””””’ बोले तैसा चाले, त्याची वंदावे पावले””””” हे तमाम सातारा सांगली जिल्ह्यातील माता-भगिनींना दाखवून देण्याची संधी प्राप्त झालेली आहे. कर्तबगार महिलांना महायुती किंवा महाविकास आघाडीने उमेदवारी देऊन खऱ्या अर्थाने नारी शक्तीचा सन्मान राखावा. बहुतेक या गोष्टीमुळे खऱ्या अर्थाने नारीशक्तीचा नारा बुलंद होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शेवटी सत्ताधारी असो किंवा विरोधी पक्ष असो तो महिलांचा सन्मान राखण्यासाठी कुठेही कमी पडणार नाही हे आता दाखवून द्यावेच लागेल.
सातारा- सांगली जिल्ह्यातील कर्तबगार महिलांमध्ये सामाजिक कार्यकर्त्या अँड. वर्षा देशपांडे, श्रीमंत गायत्रीदेवी पंत प्रतिनिधी, शारदा जाधव, विद्या पावसकर, प्राची शहाणे, सिद्धी पवार, सुरभी भोसले, चेतना सिन्हा, सोनल गोरे यांचे नाव चांगलेच चर्चेत आहे.
सातारा आणि सांगली मतदारसंघांमध्ये जवळपास ८५३ इतके मतदार आहेत. त्यापैकी सातारा जिल्ह्यातील ४३८ पैकी भाजपाकडे २२२ सदस्य आहेत. तर सांगलीत भाजपचे अंदाजे ९५ सदस्य आहेत. तुलनेत सांगली जिल्ह्यातील भाजपचे सदस्य कमी असल्याने सातारा जिल्ह्याचा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत हक्क असल्याचा महिला कार्यकर्त्या दावा आहे.
सांगली जिल्ह्यातूनही अनेकांनी फिल्डिंग लावली आहे. यामध्ये समित कदम, सम्राट महाडिक, पृथ्वीराज देशमुख हे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. याशिवाय शेखर इनामदार आणि मकरंद देशपांडे यांचीही नावे चर्चेत आहेत. मागील निवडणुकीत हा मतदारसंघ काँग्रेसकडे गेला होता. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार शेखर गोरे यांच्याकडे संख्याबळ असूनही त्यांचा राष्ट्रवादी सदस्यांनीच पराभव केला होता. जातीपातीचे राजकारण करून गद्दारी करणाऱ्या कार्यकर्त्याला महाविकास आघाडी व महायुतीने उमेदवारी देऊ नये. अशी ही मागणी पुढे आली आहे. त्याचीही आता पक्षश्रेष्ठींना नोंद घ्यावी लागत आहे.
सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कार्यकर्ता किंवा कार्यकर्ते यापैकी कुणालाही उमेदवारी द्या परंतु उमेदवार राजकीय पक्षाशी निष्ठावंत असावा. त्याने निवडणुकीत विजय झाल्यानंतर सातारा जिल्हा परिषदेच्या राहणसारखे गद्दारी करू नये. याकडे बारकाईने लक्ष द्यावे लागेल. अशी माहिती राजकीय अभ्यासकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे. शेवटी विकास कामांसाठी राजकारण होत असेल तर ठीक आहे. परंतु, एका पक्षाचे चिन्ह आणि दुसऱ्या पक्षाला पाठिंबा हे धोरण म्हणजे खऱ्या अर्थाने लोकशाहीचा खूनच आहे. अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Scroll to Top