ताज्या बातम्या
महायुतीत फूट पाडण्याचे प्रयत्न निष्फळ; ‘पुढे काय घडतंय ते पाहा’ – एकनाथ शिंदे यांचे सूचक वक्तव्य“माझ्या नेतृत्वावर विश्वास नसेल तर मी पक्षप्रमुखपद सोडायला तयार” : शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंची भावनिक सादबेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहनधारावीकरांमध्ये पुनर्वसनाबाबत संभ्रम व असुरक्षिततेची भावना, विशेष बैठक आयोजित करून स्पष्ट धोरण व लेखी हमी द्यावी – खासदार वर्षा गायकवाड यांचे cm/dcm यांना पत्रRTE च्या नावाखाली पालकांची लूट? घणसोलीतील न्यू बॉम्बे सिटी स्कूलवर गंभीर आरोप; १ हजारांचा फॉर्म, १३,६०० रुपयांची ‘अँक्टिव्हिटी फी’ अनिवार्य?

जि. प. प्राथमिक शाळा बेलदरे येथे ‘शाळा पूर्वतयारी मेळावा’ उत्साहात; चिमुकल्यांचे ‘शाळेत पहिले पाऊल’

तळमावले/वार्ताहर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेलदरे येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या पार्श्वभूमीवर ‘शाळा पूर्वतयारी मेळावा’ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. “शाळेतील पहिले पाऊल… आनंदी शिक्षणाची वाटचाल!” या संकल्पनेखाली आयोजित या मेळाव्यात नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.

मेळाव्याची सुरुवात आकर्षक रांगोळी आणि फुलांनी सजवलेल्या प्रवेशद्वारातून करण्यात आली. यावेळी अंगणवाडीतून प्राथमिक शाळेत प्रवेश करणाऱ्या चिमुकल्यांचे मुख्याध्यापिका दिलशाद नादिर मुल्ला, विकास देसाई आणि मदतनीस यांनी औक्षण करून व गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. शाळेच्या पहिल्याच दिवशी मिळालेल्या या प्रेमामुळे मुलांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण दिसून आले.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा आढावा घेण्यासाठी शाळेत विविध सात स्टॉल्स (केंद्रे) लावण्यात आले होते. यामध्ये प्रामुख्याने विद्यार्थ्यांची नाव नोंदणी, वजन व उंची मोजणे, शारीरिक विकास (उड्या मारणे, चेंडू फेकणे), आणि बौद्धिक विकास (रंग ओळखणे, आकार ओळखणे) अशा विविध कृती करून घेण्यात आल्या. तसेच भाषा विकास आणि गणनपूर्व तयारी या केंद्रांवर मुलांच्या प्राथमिक ज्ञानाची पडताळणी करण्यात आली. पालकांसाठी समुपदेशन केंद्रही कार्यान्वित होते, जिथे त्यांना मुलांच्या शालेय प्रवासाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

या मेळाव्यासाठी शाळेचे सर्व शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी आणि पालकांचा शाळेतील सहभाग वाढावा, या उद्देशाने राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Scroll to Top