ताज्या बातम्या

साताऱ्यात गटाच्या वतीने भगवान बुद्ध जयंती साजरी……

सातारा(अजित जगताप) : महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त सातारा आर पी आय पक्ष कार्यालयात बुद्ध जयंती साजरी करण्यात आली. प्रारंभी तथागत भगवान गौतम बुद्धांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करण्यात आले. तसेच त्रिशरण- पंचशील ग्रहण करण्यात आले. त्यावेळी मार्गदर्शन करताना महाराष्ट्राचे महासचिव दादासाहेब ओव्हाळ यांनी सांगितले, भगवान गौतम बुद्धांचे विचार सर्व समाजाने आत्मसात करून शांतीचा मार्ग स्वीकारावा. यासाठी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध धम्म स्वीकारला आहे. या धम्माचे आचरण करणे. हे आपले आद्य कर्तव्य आहे. आपली प्रगती ही सदाचार व आचरणातच आहे .असे त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. भगवान गौतम बुद्धांनी अहिंसेचा मार्ग स्वीकारून खऱ्या अर्थाने मानवी कल्याणाचा संदेश दिलेला आहे. चांगल्या गोष्टी या कायम आपल्या सोबत सावली सारखे असावेत. वाईट गोष्टी आपण सोडून द्याव्या. असे प्रतिपादन अजित जगताप यांनी केले. या बुद्ध जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या .या कार्यक्रमाला आर.पी.आय. सातारा जिल्हा अध्यक्ष मदन खंकाळ, युवक जिल्हाध्यक्ष किरण ओव्हाळ जनरल कामगार युनियनचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ मदाळे, उपाध्यक्ष दीपक भोसले, शहराध्यक्ष शाहरुख शेख, राजेंद्र होटकर, बंटी गायकवाड ,यशवंत ओव्हाळ, शांताराम उदागे, किशोर डेंगळे , समितेश जांभळे आदी मान्यवर उपस्थित होते. राजकीय पक्षाच्या वतीने अनेक विधायक उपक्रम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने राबवली आहेत. पक्ष जोमाने वाढत असून पक्षांमध्ये सहभागी होण्यासाठी सर्व जाती धर्मातील लोक उत्सुक असल्याचे यावेळी दिसून आले. _____________________ फोटो — आर.पी.आय.( ए गट) वतीने भगवान गौतम बुद्ध जयंती साजरी करताना मान्यवर (छाया– निनाद जगताप, सातारा)

Scroll to Top