नवी मुंबई : नवी मुंबई येथील अण्णासाहेब पाटील हॉल, सेक्टर ५, कोपरखैरणे येथे जनतेचा सावधान महाराष्ट्र या वृत्तपत्राचा पाचवा वर्धापन दिन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात आणि दिमाखात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष गणपतराव महाले उपस्थित होते, तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महानगरपालिका माजी सभागृह नेते तथा नगरसेवक रवींद्र इथापे यांनी भूषविले. विशेष अतिथी म्हणून प्रभाग समिती सभापती चंद्रभागा मोरे, नगरसेवक संदीप म्हात्रे व नगरसेविका मीनाक्षी किशोर पाटील उपस्थित होत्या.
कार्यक्रमासाठी विविध वृत्तपत्रांचे संपादक व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये *पालिका प्रशासन संपादक:- सुदीप महाराष्ट्र गुन्हे तपास- सुभाष जाधव, अनिल उबाळे, बुलंद महाराष्ट्र शासन संपादक – बबलू भाई सिद्दिकी, वाशी समाचार संपादक- सुनील तावडे, हक्काचा आवाज संपादक – प्रवीण हांडे,धगधगती मुंबई संपादक- भीमराव धुळप, खबरे आज भी राजाराम जैयस्वाल, तरुण सत्याग्रह कार्यकारी संपादक- गणेश डुंबरे व महाराष्ट्र क्राईम न्यूज उपसंपादक मुंबई- वामन चव्हाण ,खबरे आज भी प्रतिनिधी सुरेंद्र सरोज* यांचा समावेश होता.
कार्यक्रमाची सुरुवात संगीतमय वातावरणात करण्यात आली. यानंतर आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची प्रस्तावना मुख्य संपादक राजेंद्र बोडके यांनी मांडली.
यावेळी जनतेचा सावधान महाराष्ट्र राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. **ह.भ.प. अशोक महाराज काळे – आध्यात्मिक भूषण पुरस्कार**, **प्रकाश भागवत – हास्य सम्राट गौरव पुरस्कार**, **एकनाथ अडसूळ – गुन्हेगारी क्राइम पत्रकारिता पुरस्कार**, **निलेश कचरे – समाजभूषण गौरव पुरस्कार**, **डॉ. सचिन पिसाळ – आरोग्य सेवा पुरस्कार**, **दिलीप सातकर – साहित्यरत्न पुरस्कार**, **डॉ. सचिन लोखंडे – महिला आरोग्य सेवा गौरव पुरस्कार**, **पारिजात को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. – सहकार रत्न पुरस्कार**, **कुमारी मानसी पोळ – युवा उद्योजिका गौरव पुरस्कार**, **गुणवंत शांताराम चौधरी – यशस्वी उद्योजक पुरस्कार**, **युनिक डायग्नोस्टिक सेंटर – लोकहित सेवा पुरस्कार**, **संजय मोरे – शिक्षण समाज भूषण पुरस्कार** तसेच **शिवाजी बोडके व विना बोडके – आध्यात्मिक प्रवास गौरव पुरस्कार** प्रदान करण्यात आले.
**कार्यक्रमादरम्यान अध्यक्ष रवींद्र इथापे यांनी आपल्या प्रभावी आणि ओजस्वी भाषणातून संपादक राजेंद्र बोडके यांच्या कार्याचा विशेष गौरव केला. त्यांनी सांगितले की, तळागाळातून पुढे आलेले राजेंद्र बोडके हे केवळ एक संपादक नसून समाजासाठी लढणारे, सत्यासाठी झटणारे आणि सामान्य माणसाच्या प्रश्नांना न्याय मिळवून देणारे एक निर्भीड व्यक्तिमत्त्व आहे. नवी मुंबईत येऊन स्वतःचा व्यवसाय सांभाळत त्यांनी पत्रकारितेतही उल्लेखनीय कार्य करत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.**
**ते पुढे म्हणाले की, गेल्या पंधरा वर्षांपासून त्यांनी पत्रकारितेत सातत्याने काम करत “सवाल महाराष्ट्र” या डिजिटल माध्यमातून असंख्य नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवल्या. विशेषतः कोरोना काळात जेव्हा अनेकजण मागे हटले, त्या कठीण परिस्थितीत त्यांनी “जनतेचा सावधान महाराष्ट्र” हे वृत्तपत्र सुरू करून ते यशस्वीपणे चालवले, ही अत्यंत धाडसी आणि प्रेरणादायी बाब आहे. त्यांच्या निर्भीड, निपक्ष आणि जनहितवादी पत्रकारितेमुळेच या वृत्तपत्राने अल्पावधीत समाजात विश्वासार्ह स्थान निर्माण केले आहे, असेही त्यांनी नमूद केले.**
**प्रमुख पाहुणे गणपतराव महाले यांनी आपल्या प्रभावी आणि विचारप्रवर्तक भाषणातून पत्रकारितेच्या बदलत्या स्वरूपावर सखोल भाष्य केले. त्यांनी सांगितले की, महाराष्ट्राला बाळशास्त्री जांभेकरांपासून सुरू झालेली समृद्ध आणि गौरवशाली पत्रकारितेची परंपरा लाभली आहे आणि ही परंपरा जपण्याची जबाबदारी आजच्या पत्रकारांवर आहे.**
**ते पुढे म्हणाले की, आजच्या डिजिटल युगात माध्यमांची संख्या वाढली असली, तरी सत्य आणि निष्पक्षता या मूल्यांना काही ठिकाणी तडा जाताना दिसतो. अशा परिस्थितीत राजेंद्र बोडके यांसारखे पत्रकार निस्वार्थ भावनेने आणि कोणत्याही दबावाला न जुमानता सत्य परिस्थिती जनतेसमोर मांडण्याचे कार्य करत आहेत, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. “सवाल महाराष्ट्र टीव्ही न्यूज” सारख्या माध्यमातून त्यांनी सातत्याने समाजातील प्रश्नांना वाचा फोडली असून त्यांच्या लेखनशैलीतून समाजजागृतीचे कार्य घडत आहे, असे त्यांनी गौरवोद्गार काढले.**
*कोरोना काळाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, त्या कठीण काळात माध्यमांनी अत्यंत जबाबदारीने काम करणे गरजेचे होते. अनेक ठिकाणी भीतीचे वातावरण असताना, काही माध्यमांनीच जनतेपर्यंत सत्य आणि आवश्यक माहिती पोहोचवली. यामध्ये जनतेचा सावधान महाराष्ट्र सारख्या माध्यमांची भूमिका उल्लेखनीय ठरली आहे.*
या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी जनतेचा सावधान महाराष्ट्र वृत्तपत्राच्या व्यवस्थापकीय संपादक कुमारी समीक्षा राजेंद्र बोडके यांनी विशेष परिश्रम घेत मोलाचे योगदान दिले.
कार्यक्रमासाठी जनतेचा सावधान महाराष्ट्र टीमचे प्रतिनिधी म्हणून साईनाथ शिंगोटे, शरद ढोकरे, कानिफनाथ गवांदे, अमोल होजगे, विवेक पाटील, मयूर आरोटे, प्रमोद माने, कादिर खान, संभाजी जाधव, अशोक काळे, सारिका भोर आणि आशा कांबळे यांनी विशेष परिश्रम घेत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले.
कार्यक्रमाच्या शेवटी जनतेचा सावधान महाराष्ट्र वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक कुंडलिक कानगुडे यांनी उपस्थित मान्यवर व प्रेक्षकांचे आभार मानले. आपल्या संयोजक कौशल्य, शांत नेतृत्व आणि संघटनक्षमतेमुळे त्यांनी संपूर्ण कार्यक्रमाला सुबक आणि यशस्वी रूप दिले. त्यांच्या नियोजनबद्ध कार्यशैलीमुळेच हा सोहळा अधिक प्रभावी आणि संस्मरणीय ठरला.




