ताज्या बातम्या
“कटकारस्थानातून पराभव, राजीनामा नाही” — ममता बॅनर्जींचा संतप्त आरोप; निवडणूक आयोग व केंद्र सरकारवर गंभीर निशाणामुंबईत जन्म-मृत्यू नोंदींमध्ये मोठा घोटाळा? ८७ हजार नोंदी संशयाच्या भोवऱ्यात; दोषींवर कारवाईची मागणीसेनापती बापट मार्गावरील मीनाताई फूल मार्केट परिसरात तरुणांवर जीवघेणा हल्ला; एकाची प्रकृती चिंताजनकस्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर मिसिंग लिंक मार्ग” असे नामकरण जाहीर करण्याची संतोष पटकारे यांची मुख्यमंत्री यांचेकडे मागणी७५ दिव्यांनी ओवाळणी औक्षण आणि केक यांचा संगम ! स्वर हार्मनीच्या गीतांच्या नजराण्याने सौ. सुनंदा धोंडू घरटकर यांचा अमृतमहोत्सव साजरा

सायन भुयारी मार्ग अंधारात; प्रवाशांना त्रास, कामाची गतीही मंद

मुंबई (संतोष कदम) : सायन रेल्वे स्टेशनजवळ नव्याने तयार करण्यात आलेला भुयारी मार्ग धारावी तसेच नाईक नगर, एलबीएस मार्ग (कुर्ला) या भागाकडे जाण्यासाठी खुला करण्यात आला असला, तरी या मार्गात मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचे समोर आले आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी प्रकाशयोजनेचा पूर्ण अभाव असून, दिवसाही बोगद्यात अंधाराचे वातावरण असते.

या अंधाराचा फायदा भटक्या कुत्र्यांनी तसेच फेरीवाले आणि गरदुल्यांनी घेतल्याचे दिसून येत आहे. परिणामी, प्रवाशांना या मार्गातून जाताना भीतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले असून, नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
दरम्यान, सायन येथील जुना ब्रिटिशकालीन पूल नव्याने उभारण्याचे काम सुमारे दोन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले होते. मात्र, अद्याप या कामाची गती अत्यंत मंद असून, ते नेमके कधी पूर्ण होणार याबाबत स्थानिकांमध्ये संभ्रम आहे.
धारावीहून सायन-पनवेल रोडकडे जाणाऱ्या नागरिकांसह या परिसरातील साधना विद्यालय, आवर लेडी स्कूल आणि डी.एस. हायस्कूल येथील शालेय विद्यार्थी मोठ्या प्रमाणात या मार्गाचा वापर करतात. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने हा प्रश्न अधिक गंभीर ठरत आहे. तात्पुरत्या स्वरूपात लोखंडी पूल उभारण्यात आला असला, तरी तो कायमस्वरूपी उपाय ठरत नाही.
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे भुयारी मार्गातील अंधारामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या संदर्भात रेल्वे आणि महापालिका प्रशासनाने तातडीने दखल घेऊन भुयारी मार्गात प्रकाशयोजना सुरू करावी, तसेच सुरू असलेल्या पुलाच्या कामाला गती द्यावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
Scroll to Top